[rank_math_breadcrumb]

‘शाहरुखसोबत काम करणं अनेक कलाकारांच स्वप्न’, सौरभ शुक्ला यांनी मांडले मत

अभिनेता सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) सध्या त्यांच्या नव्या दिग्दर्शित चित्रपट जब खुली किताबमुळे चर्चेत आहेत. याचबरोबर ते यंदा शाहरुख खानसोबत किंग या चित्रपटातही दिसणार आहेत. अलीकडेच सौरभ शुक्ला यांनी शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितले की अनेक कलाकारांसाठी शाहरुख खानसोबत काम करणे हे एक स्वप्न असते.

आयएनएसच्या माहितीनुसार, सौरभ शुक्ला म्हणाले की, शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळण हे अनेक अभिनेत्यांच स्वप्न असत. प्रत्येकजण त्यांना खूप पसंत करतो. त्यांच्या ऑफिसमधून एक फोन आला किंवा त्यांनी स्वतः कॉल केला तरी अनेकजण त्यांच्यासोबत काम करण्यासाठी काहीही करायला तयार होतात. मात्र, यावेळी सौरभ शुक्ला यांनी ‘किंग’ चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला.

चित्रपटात त्यांचे किती सीन आहेत, अस विचारल असता सौरभ शुक्ला यांनी हा प्रश्न टाळला. ते म्हणाले की, चित्रपटाबद्दल तितकेच सांगतील जितके सांगायचे आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ‘किंग’ हा चित्रपट पाहावा लागेल.
ते पुढे म्हणाले की हा खूप मोठा चित्रपट असून अनेक कलाकार त्याचा भाग होऊ इच्छितात. चित्रपटात इंडस्ट्रीतील जवळपास 70 टक्के कलाकार सहभागी असल्याचही त्यांनी सांगितल. सौरभ शुक्ला यापूर्वीही शाहरुख खानसोबत बादशाह आणि हे राम या चित्रपटांत काम केलंय.

त्याचबरोबर सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ या चित्रपटात शाहरुख खानसह अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर, जयदीप अहलावत, रानी मुखर्जी, जॅकी श्रॉफ, अरशद वारसी आणि राघव जुयाल हे कलाकार दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात शाहरुख खानसोबत त्यांची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे.

दरम्यान, सौरभ शुक्ला यांनी अलीकडेच ‘जब खुली किताब’ या चित्रपटाच दिग्दर्शन केल आहे. हा चित्रपट त्यांच्या एका मूळ नाटकावर आधारित आहे. ६ मार्चपासून हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया प्रमुख भूमिकांमध्ये दिसतायेत . चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर दीर्घकाळ एकत्र राहिलेल्या दांपत्याच्या आयुष्यात एक गुपित उघड झाल्यानंतर त्यांच्या नात्यात निर्माण होणाऱ्या तणावाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.