Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड ‘झूमे जो पठान’ गाण्याचा बिहाइंड द सीन व्हिडिओ व्हायरल, गाण्यात ‘हा’ सीन करण्यासाठी शाहरुखला वाटत होती लाज

‘झूमे जो पठान’ गाण्याचा बिहाइंड द सीन व्हिडिओ व्हायरल, गाण्यात ‘हा’ सीन करण्यासाठी शाहरुखला वाटत होती लाज

शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमाने अमाप कमाई करत विविध रेकॉर्ड तयार केले. या वर्षातला किंबहुना मागील अनेक वर्षातला सर्वत मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून आता ‘पठाण’ ओळखला जाईल. या सिनेमाने जगभरात तब्बल ९४६ कोटींची कमाई केली असून, अजूनही ही घोडदौड चालू आहे. सिनेमासोबतच सिनेमाच्या गाण्यांनी देखील लोकप्रियतेचे रेकॉर्ड केले आहे. सिनेमातील ‘झूमे जो पठान’ हे गाणे तर सध्या तुफान गाजत आहे. गाण्याच्या डान्स स्टेप्स देखील लोकप्रिय झाल्या आहेत. नुकताच निर्मात्यांनी या गाण्याचा एक बिहाइंड द सीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि दीपिकासोबत कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस हे या गाण्याचा सराव करताना दिसत आहे.

पठाणच्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओसोबतच हे देखील सांगितले की, या गाण्यात शाहरुख खान शर्ट खोलून त्याचे ऍब्स दाखवण्यासाठी लाजत होता. शाहरुख व्हिडिओमध्ये सांगतो की, “शर्टलेस होण्यासाठी आणि ऍब्स दाखवण्यासाठी माझ्यासोबत साजिश केली जात आहे.” या गाण्यात शाहरुखला शर्टलेस नव्हते व्हायचे. यासाठी तो हट्ट धरून बसला होता. यावर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणतो, “शाहरुख खूपच लाजाळू व्यक्ती आहे. त्याला शर्टलेस नव्हते व्हायचे यासाठी तो नकार देत होता, मात्र गणायची गरज पाहता त्याने ते केले. ” यावर शाहरुख म्हणतो, “शर्टलेस होण्यासाठी तू मला उद्या पिझ्झा खाऊ घाल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bosco Martis (@boscomartis)

बॉस्को मार्टिसने देखील गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. सोबतच त्याचा आणि शाहरूखचा एक फोटो देखील होता. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते, “नक्कीच हा माझ्या इन्स्टा पेजवरील सर्वात चांगल्या फोटोंपैकी एक फोटो असेल. हा फोटो मिळवणारा मी खूप भाग्यशाली आहे. मला माहिती आहे की तुम्ही तुमचे ऍब्स दाखवण्यातही खूप लाजत होता. हे माझ्यासाठी एक अनमोल क्षण होते. धन्यवाद.”

यशराज बॅनरचा ‘पठाण’ हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा हिट सिनेमा असून, याने सर्व मागील चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. हा सिनेमा ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांना मागे टाकत पाचवा सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा