दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अजूनही या धक्क्यातून इंडस्ट्री सावरू शकलेली नाही. त्याचे कुटुंबीय आणि त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाझ गिल त्याच्या निधनामुळे प्रचंड दु:खी आहेत. अनेक मोठ- मोठे कलाकार त्याच्या निधनावर हळहळ व्यक्त करत आहेत. माध्यमांमध्ये फक्त सिद्धार्थचीच चर्चा होत आहे.
दरम्यान, सिद्धार्थ आणि शहनाझच्या एका चाहत्याने त्यांचा काही दिवसांपूर्वीचा बिग बॉस ओटीटीमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये शहनाझ म्हणते की, “आमचे नाते कधीही तुटणार नाही.” एवढेच नाही, तर चाहत्याने या व्हिडिओला “नजर लागली,” असे कॅप्शन देखील दिले आहे. चाहत्यांना असे वाटते की, शहनाझ आणि सिद्धार्थच्या नात्याला नजर लागली आहे आणि त्यांची कथा ध्येयाकडे पोहोचण्यापूर्वीच संपली.
Nazar lag gai ????
Just some days before when #SidharthShukIa & #ShehnaazGiII (aka #SidNaaz ) came in #BigBossOTT ! pic.twitter.com/foLgGdbVJD
— ???? (@wylde_heh) September 2, 2021
हा व्हिडिओ त्या वेळचा आहे. जेव्हा करण जोहर बिग बॉसच्या सेटवर आला होता. त्याचवेळी शहनाझ त्याला सांगत आहे की, “जे बॉयफ्रेंड आहेत, ते निघून जातात. पण, आमचे नाते कधीच तुटणार नाही.” शहनाझच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, ती मनापासून सिद्धार्थशी जोडलेली होती आणि तिचे नेहमीच सोबत राहण्याचे स्वप्न होते. शहनाझच्या या स्वप्नांचा गुरुवारी (२ सप्टेंबर ) भंग झाला. सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले जात आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला.
शहनाझ स्वतःला अजूनही सावरू शकली नाही
शहनाझची सिद्धार्थशी असलेली ओढ यावरून लक्षात येते की, दोन दिवसांनंतर देखील शहनाझ धक्क्यात आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार होताच ती जमिनीवर कोसळली. तिचे अश्रू थांबायचे नाव घेत नाहीत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी देखील खूप भावूक झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…