सोनू सूदने आईची काढली आठवण; वाढदिवशी केली भावुक पोस्ट शेअर, वाचून तुमचेही डोळे पाणावतील


बॉलिवूडमधील चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात खूपच दयावान व्यक्ती आहे. अभिनयाव्यतिरिक्त तो सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असतो. तो आपल्या आयुष्यातील गोष्टी, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. तो आपल्या आईच्या आठवणीतही अनेक पोस्ट शेअर करत असतो. सन २००७ मध्ये त्याच्या आईचे म्हणजेच सरोज सूद यांचे निधन झाले होते. बुधवारी (२१) त्यांच्या वाढदिवशी सोनूने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्याने आपल्या आईचे तीन ब्लॅक एँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. सोनू आपल्या आईची खूप आठवण काढत असतो. त्याची ही पोस्ट पाहून त्याचे चाहतेही भावुक झाले आहेत. (Actor Sonu Sood Remember His Mother Saroj Sood On Her Birth Anniversary)

सोशल मीडियावर फोटो शेअर करून सोनूने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. काश मी आपणास वैयक्तिकरित्या शुभेच्छा देऊ शकलो असतो आणि आपण मला शिकवलेल्या जीवनातील धड्यांसाठी आभार मानू शकलो असतो. हा संदेश मी कधीच व्यक्त करू शकत नाही की, मला तुमची किती आठवण येते. तुमच्याविना माझे आयुष्य रिकामे आहे, ते नेहमीच कायम राहील, जोपर्यंत मी पुन्हा तुम्हाला पाहू शकेल.

यापूर्वीही सोनूने आपल्या आईच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या आईचा फोटो आणि त्याने आपल्या हाताने लिहिलेली चिट्टी शेअर केली होती. अभिनेत्याने जो व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तारें जमीं पर’ चित्रपटाचे गाणे ‘माँ’ वाजत आहे. व्हिडिओत सोनूने त्याच्या आईसाठी लिहिलेल्या जुन्या नोट्स दिसत आहेत, ज्या त्याने आपल्या आईला आठवून लिहिल्या होत्या.

सोनूची आई एक प्राध्यापिका होत्या. कोरोना काळात गरिबांसाठी ‘देवदूत’ बनलेल्या सोनूच्या आईच्या सन्मानात नुकतेच ते राहत असलेले भागाला म्हणजेच पंजाबमधील मोगामध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले होते. अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर करत यावर आपला आनंद व्यक्त केला होता. तसेच म्हटले होते की, ही जागा खूपच खास आहे. कारण, इथे एक रस्ता त्याची आई सरोज सूद यांच्या नावाने ओळखला जातो. अभिनेत्याने सांगितले की, त्याची आई जेव्हा कॉलेजला जायच्या, तेव्हा त्या रस्त्यावरून जात असायच्या. त्यामुळे हा रस्ता त्याच्यासाठी खूप खास आहे.

सोनूच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा सन २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंबा’ चित्रपटात झळकला होता. तो आगामी ‘पृथ्वीराज’, ‘आचार्य’ यांसारख्या चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


Leave A Reply

Your email address will not be published.