Thursday, September 28, 2023

सनीने जिंकली कोट्यवधी मने! विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेत अभिनेत्याने साजरा केला रक्षाबंधन सण- व्हिडिओ

अभिनेता सनी देओल याचा ‘गदर 2‘ सिनेमा भारतातच नाही, तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाल कमाई करत आहे. या सिनेमाला रिलीज होऊन आता 20 दिवस लोटले आहेत. मात्र, अजूनही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे. सनी देओलचा ‘गदर 2’ हा आतापर्यंतचा सर्वात हिट सिनेमा बनला आहे. या सिनेमाचे यश अभिनेता वेगवेगळ्या प्रकारे साजरे करताना दिसत आहे. अशात सनी देओलने शाळेतील मुलींसोबत रक्षाबंंधन साजरा केला आहे. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

सनी देओल व्हिडिओ व्हायरल
सनी देओल (Sunny Deol) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सनी शाळेतील विद्यार्थिनींकडून कपाळावर टिळा लावून त्यांच्याकडून हातावर राखी बांधून घेताना दिसत आहे. तसेच, तो त्यांच्या हाताने मिठाईदेखील खाताना दिसत आहे. यासोबतच अभिनेता त्यांना भेटवस्तूही देत आहे.

विद्यार्थिनींसोबत साजरा केला रक्षाबंधन सण
खरं तर, सनी देओल 29 ऑगस्ट रोजी मुंबईच्या एका चित्रपटगृहात ‘गदर 2’ सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी पोहोचला होता. त्याला पाहून चाहतेही हैराण झाले. यादरम्यान अभिनेत्याने भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन साजरा केला. यादरम्यान शाळेतील विद्यार्थिनींनी यावएळी त्याला राखी बांधली. त्यानंतर सनीने त्यांना मिठी मारली आणि त्यांच्या कपाळाचे चुंबनही घेतले. यासोबतच त्याने मुलींना भेटवस्तूही दिल्या.

रक्षाबंधननिमित्त चाहत्यांना खास ऑफर
‘गदर 2’च्या यशानंतर निर्मात्यांनी रक्षाबंधननिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे. सिनेमा पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांनी जर 2 तिकीटे खरेदी केली, तर त्यांना आणखी 2 तिकीटे मोफत मिळणार आहेत. ही ऑफर 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, 2023पर्यंतसाठीच आहे. अशात म्हटले जात आहे की, रक्षाबंधनच्या निमित्ताने चाहते चित्रपटगृहामध्ये जबरदस्त गर्दी करू शकतात.

सिनेमाची 19व्या दिवसाची कमाई
‘गदर 2’ सिनेमाने रिलीजच्या 19व्या दिवशी 5.10 कोटींची कमाई केली. यासोबतच सिनेमाचे एकूण कलेक्शन 465.75 कोटी रुपये झाले आहे. आता निर्मात्यांना सिनेमाच्या 500 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याची प्रतीक्षा आहे. (actor sunny deol celebrated rakshabandhan with school girl fans in theatre during gadar 2 screening read here)

हेही वाचा-
अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ बाबतीत बनला पहिला भारतीय सुपरस्टार, लगेच वाचा
बॉयफ्रेंडने धोका दिला, तर काय करणार शाहरुखची लेक? लक्षवेधी उत्तर देत म्हणाली, ‘मी त्याला…’

हे देखील वाचा