Saturday, June 29, 2024

नाद केला पण पुरा केला! ‘तारा-सकीना’च्या ‘Gadar 2’ने तिसऱ्या दिवशी छापले ‘एवढे’ कोटी, ‘पठाण’चाही विक्रम तुटला

ऍक्शन ठासून भरलेल्या बहुप्रतिक्षित ‘गदर 2‘ सिनेमा दरदिवशी कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. सनी देओल याच्या या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तारा आणि सकीनाच्या जोडीला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करतायेत. प्रेक्षकांकडून सिनेमाला भरभरून प्रेम मिळत आहे. पहिल्या दिवशी 40.10 कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाने वीकेंडलाही चांगलाच गल्ला जमवला आहे. इतकेच नाही, तर 2023चा ब्लॉकबस्टर ‘पठाण‘ सिनेमा तसेच ‘बाहुबली‘ यांसारख्या सिनेमांचाही विक्रम मोडीत काढला आहे. चला तर, सनी आणि अमीषा पटेल अभिनित सिनेमाने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली जाणून घेऊयात…

‘गदर 2’ची रविवारची कमाई किती?
सन 2001मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar: Ek Prem Katha) सिनेमाचा सीक्वल ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमा तब्बल 22 वर्षांनंतर या शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज झाला. या सिनेमाला पहिल्या दिवसापासून चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यासोबतच सिनेमा बक्कळ कमाईदेखील करत आहे. सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं, तर या दरदिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ होत आहे. शनिवानंतर आता तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. 14 ऑगस्ट) ‘गदर 2’ सिनेमाच्या कमाईत 18 टक्के वाढ झाली.

सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ सिनेमाने पहिल्या दिवशी 40.10 कोटी, दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी आणि आता वृत्तांनुसार, सिनेमाने तिसऱ्या दिवशी 49.50 ते 51.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह सिनेमाने तीनच दिवसात एकूण 134 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘गदर 2’ने मोडला ‘पठाण’ आणि ‘बाहुबली’चा विक्रम
विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱ्या ‘गदर 2’ सिनेमाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. तिसऱ्या दिवशी सिनेमाने ‘पठाण’ (Pathaan) आणि ‘बाहुबली’ (Baahubali) यांसारख्या मेगा ब्लॉकबस्टर सिनेमांचाही विक्रम मोडला आहे. या सिनेमांच्या तिसऱ्या दिवसाची कमाई काय होती ते पाहूया…

-पठाण सिनेमाने तिसऱ्या दिवशी 39 कोटी रुपयांची कमाई केली होती.
-केजीएफ सिनेमाने तिसऱ्या दिवशी 50.35 कोटी रुपयांची कमाई केली होती.
-बाहुबलीने सिनेमाने तिसऱ्या दिवशी 46.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.
-टायगर जिंदा है सिनेमाने तिसऱ्या दिवशी 45.53 कोटी रुपयांची कमाई केली होती.
आणि आता ‘गदर 2’ सिनेमाने तिसऱ्या दिवशी 51.50 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.

‘गदर 2’ सिनेमातील कलाकार
अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित ‘गदर 2’ सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी आयकॉनिक पात्र तारा सिंग आणि सकीना साकारले आहेत. तसेच, सिनेमात उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. (sunny deol film gadar 2 box office collection day 3 know the numbers)

महत्त्वाच्या बातम्या-
खळबळजनक! अक्षय कुमारला चापट मारा आणि 10 लाख मिळवा, कुणी आणि का केली अशी घोषणा?
सलमान नसता तर ‘हा’ अभिनेताही नसता, सल्लूमुळेच त्याने Bollywoodमध्ये रोवले घट्ट पाय

हे देखील वाचा