Sunday, July 14, 2024

जान्हवीने आवडत्या सह-कलाकाराबाबत केला खुलासा, ‘बवाल’ चित्रपटात करणार एकत्र काम

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा तिच्या चित्रपटामुळे चर्चेत असते. सध्या जान्हवी तिच्या आगामी ‘मिली‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यासाठी जान्हवी खूपच उत्साहित आहे. चित्रपट आणि अभिनयाव्यतिरिक्त जान्हवी सर्व मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसते. अलीकडेच, जान्हवी कपूरने असा काही खुलासा केला की, तिचे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला.

आजकाल जान्हवी (janhvi kapoor) तिच्या आगामी ‘मिली’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट हाेण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही आहे. यासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनच्या बहाण्याने जान्हवी तिच्या चित्रपटाबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने बोलत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीचा आवडता सहकलाकार वरूण धवन
या सगळ्यामध्ये जेव्हा जान्हवीला तिच्या आवडत्या सहकलाकारांबद्दल विचारले गेले तेव्हा तिने वरुण धवनचे नाव घेतले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, जान्हवीने माध्यमांशी बाेलताना तिच्या आवडत्या को-स्टारचा खुलासा केला. तिचा आवडता सहकलाकार, वरुण धवन असल्याचे तिने सांगितले. अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणाली की, “अभिनेता वरुण धवनसोबत काम करणे ही तिच्यासाठी नशिबाची बाब आहे.”

जान्हवी आणि वरूण ‘बावल’ चित्रपटात शेअर करणार स्क्रीन
नितेश तिवारीच्या ‘बावल’ चित्रपटात वरुण आणि जान्हवी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. नुकतेच दोघेही युरोपमध्ये शेड्यूल शूट करताना दिसले. जान्हवीने स्वतः युरोपमधील वरुणसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ती खास पाेस्ट आजही सोशल मीडियावर चाहत्यांना आवडते. ‘बावल’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा एक विनोदी चित्रपट आहे, जो मनोरंजनाने परिपूर्ण आहे. हा चित्रपट फार भारी बजेटमध्ये बनवला असुन 7 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारत-पाकिस्तान सामन्याचा आयुष्मानने शेअर केला रंजक किस्सा, जाणून घ्या एका क्लीकवर

प्रभासच्या चाहत्यांनी केला कहर; चक्क चित्रपट गृहातच वाजवले फटाके अन् …

हे देखील वाचा