Sunday, July 14, 2024

प्रभासच्या चाहत्यांनी केला कहर; चक्क चित्रपट गृहातच वाजवले फटाके अन् …

प्रत्येक कलाकाराचे एवढे फॅन्स असतातकी ते कशाप्रकारे आपले प्रेम व्यक्त करतील हे सांगने फारच कठीण असते. आपल्या आवडत्या कलाकारसाठी कधी काय करतील याचा काय नेम नसतो. असेच लोप्रिय कलाकार प्रभास याच्या फॅन्सने असे काही काम केले आहे की, चक्क अपघात होताहोता वाचला आहे. रविवार (दि. 23 ऑक्टोंबर) दिवशी अभिनेत्याचा वाढदिवस होता त्यामुळे चित्रपट गृहामध्ये कलाकाराच्या जुना चित्रपट लावण्यात आला होता. मात्र, चाहत्यांनी असा गोंधळ केला की, सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

आपला लाडका अभिनेता प्रभास याचा रविवारी वाढदिवस असल्यामुळे आंध्रप्रदेशच्या चित्रपटगृहामध्ये अभिनेत्याचा जुना चित्रपट ‘बिल्ला’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला होता तेव्हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची चांगलीच गर्दी झाली होती. त्यामध्येच कलाकाराच्या काही जबराट फॅन्सने तर हद्दच पार केली होती, त्या चाहत्यांंनी चक्क चित्रपटगृहाच्या आतमध्येच फटाके फोडले त्यामुळे लोकांमध्ये खूप गोंधळ झाला आणि लोकांना चित्रपटगृहाच्या बाहेर पडावे लागले. फटाकड्यांच्या आवाजाने सगळीकडेच गोधळ माजला होता.

ही घटना आंद्धप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील ताडेपल्लीगुडेम कस्बे या गावामधली घडली होती. प्रभासच्या चाहत्यांनी अतीउत्साहामध्ये चक्क व्यंकटरमण चित्रपट गृहामध्येच फटाकडे लावण्यात आले ज्यामुळे चित्रपट गृहाच्या सिटला आग लागली आणि हळूहळू ही आग पसरु लागली. आग वाढल्यामुळे लोक बाहेरच्या दिशेने धावू लागले आणि लोकांमध्ये गोंधळ सुरु झाला. तेथील कर्मचाऱ्यांनी आगीवर वेळीच मियंत्रण मिळवण्यात यश मिळवले मात्र, त्या ठिकाणी अनेक वस्तुंचे नुकसान झाले. सुंदैवाने कोणत्याही व्यक्तीला हानी पोहोचली नाही.

प्रभासचा बिल्ला चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री अनुष्का शेट्टी होती. प्रभासच्या वाढदिवसानिमित्त या चित्रटाला आंध्रप्रदेश आणि तेलंगाणाच्या चित्रपटगृहामध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभासचे दिवंगत काका कृष्णम राजू यांनी केले हेते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे अभिनेता खूपच दु:खी झाला होता. काकांच्या निधनामुळे प्रभासने यावर्षी आपला वाढदिवस जदेखिल साजरी केला नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिवाळी पार्टीत न्यासा देवगणचा लूक पाहून व्हाल थक्क; नेटकरी म्हणाले,’ चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केलीस…’
कॉमेडियन कपिलचा रोमांटिक अंदाज पाहून चाहतेही म्हणाले, ‘वन्स मोर’

हे देखील वाचा