विकी कौशलने रणवीर सिंगच्या ‘८३’साठी दिले होते ऑडिशन, पण ‘या’ कारणामुळे बदलला निर्णय


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘८३’ या चित्रपटाच्या कथेचे प्रचंड कौतुक होत आहे. या चित्रपटात दिग्दर्शक कबीर खान यांनी मोठ्या पडद्यावरील अनुभवी कलाकारांना एकत्र आणले आहे. कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग, ताहिर राज भसीनच्या भूमिकेत सुनील गावस्कर आणि मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत साकिब सलीम आहेत. पण ‘८३’ मध्ये मोहिंदर अमरनाथसाठी साकिब ही पहिली पसंती नव्हती, तर कबीर खानला अभिनेता विकी कौशलला (Vicky Kaushal) या भूमिकेत कास्ट करायचे होते.

माध्यमांतील वृत्तानुसार, विकीने ‘८३’ साठी ऑडिशन देखील दिले होते. सूत्राने सांगितले की, “विकीने त्याचा ‘राजी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. पण नंतर जेव्हा ‘राजी’ हिट झाला, तेव्हा विकीने स्वतःला या प्रोजेक्टपासून दूर ठेवणे पसंत केले. विकीला चित्रपटात सेकंड लीड व्हायचे नव्हते. कबीर खानला विकीला आपल्या चित्रपटात घ्यायचे होते. जेव्हा विकीने ‘८३’ करायला नकार दिला, तेव्हा साकिब सलीमला या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले.

विकीला व्हायचे नव्हते सेकंड लीड
‘राजी’ हिट झाल्यानंतर विकीने लागोपाठ अनेक हिट चित्रपट दिले. यामध्ये ‘लस्ट स्टोरीज, ‘संजू’, ‘मनमर्जियां’, ‘उरी’, ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘सरदार उधम सिंग’ काही महिन्यांपूर्वीच रिलीझ झाला आहे. या चित्रपटातील विकीच्या अभिनयाचे प्रेक्षकांना वेड लावले होते. दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या दिग्दर्शनामुळे प्रेक्षकही त्यांचे चाहते झाले.

कॅटरिनासोबत केले लग्न
विकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ९ डिसेंबर रोजी त्याने अभिनेत्री कॅटरिना कैफशी (Katrina Kaif) लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांनंतर, अभिनेता देखील त्याच्या कामावर परतला आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग करत आहे. विकीच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘गोविंदा नाम मेरा’चा समावेश आहे. विकी सारा अली खानसोबत आणखी एका चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!