कॅटरिना कैफने सलमान खानला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाली ‘तुला खूप…’


बॉलिवूडचा ‘दबंग’ खान म्हणजेच सलमान खान सोमवारी (२७ डिसेंबर) त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी चाहत्यांसोबतच कलाकारही त्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत आहेत. मात्र चाहते कॅटरिना कैफच्या शुभेच्छांची वाट पाहत होते. उशिरा का होईना पण कॅटरिनाने सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत एक खास संदेशही दिला आहे. कॅटरिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॅटरिनाने सलमानचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे.

सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कॅटरिना (Katrina Kaif) आणि सलमान (Salman Khan) दोघे चांगले मित्र आहेत. कॅटरिना विवाहित असली, तरी तिच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला ती विसरलेली नाही. अलिकडेच कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर सलमानचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत ती लिहिले की, “हॅपी बर्थडे सलमान खान, तुला खूप आनंद आणि आदर मिळो.”

katrina kaif
Photo Courtesy: Instagram/katrinakaif

‘या’ चित्रपटात सलमानसोबत दिसली आहे कॅटरिना

कॅटरिना आणि सलमानने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ज्यामध्ये ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’, ‘मैने प्यार क्यूं किया’ आणि ‘पार्टनर’ या चित्रपटांचा समावेश आहे. एवढेच नाही, तर आता या दोघांचा ‘टायगर ३’ हा मोठा चित्रपटही येणार आहे. सलमान खानच्या या घोषणेनंतर पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट येणार असल्याचे मानले जात आहे. शाहरुख खानचा ’पठाण’ हा चित्रपटही यावेळी प्रदर्शित होणार आहे.

सलमानच्या वडिलांचे नाव सलीम खान आणि आईचे नाव सलमा खान आहे. त्याला अरबाज खान आणि सोहेल खान हे दोन भाऊ आहेत, तर अर्पिता खान आणि अलविरा खान या अग्निहोत्री या दोन बहिणी आहेत. सलमानचे कुटुंबीयही त्याच्या वाढदिवसाची वाट पाहत असतात आणि त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करतात.

Photo Courtesy: Instagram/beingsalmankhan & katrinakaif

सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘अंतिम’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याचा मेहुणा आयुष शर्माही दिसणार आहे. या चित्रपटानंतर सलमान खान लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

बेगानी शादी मैं ‘मिका’ दिवाना, न बोलवताच लग्नात पोहचले मिका आणि राहुल, त्यांना बघून उडाला कल्ला

‘ही दोस्ती तुटायची नाय’, विकासने दिल्या विशालला भावी आयुष्याच्या शुभेच्छा

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल 


Latest Post

error: Content is protected !!