×

Drink And Drive | काव्या थापर पूर्वी ‘या’ कलाकारांवर झालाय दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काव्या थापरला (Kavya Thapar) नुकतेच जुहू पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिने दारू पिऊन गाडी चालवत अपघात केला, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला होता. याच गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी काव्या अशी पहिली अभिनेत्री नाही जिला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणात अटक झाली आहे. या आधीही अनेक कलाकारांना या गुन्ह्यात अटक झाली आहे. कोण आहेत हे कलाकार चला जाणून घेऊ…

सलमान खान (Salman Khan)
ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सगळ्यात जास्त चर्चा अभिनेता सलमान खानची झाली आहे. सलमान खानने २००२ मध्ये दारू पिऊन गाडी चालवताना फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर गाडी घातली होती. हे प्रकरण प्रचंड चर्चेत आले होते. सलमान खानने यावर मी गाडी चालवत नव्हतो असा जबाब दिला होता.

दलीप ताहिल (Dalip Tahil)
‘बाझीगर’, ‘राजा’, ‘इश्क’, ‘रावण’ अशा अनेक चित्रपटात दमदार अभिनय करणारे प्रसिद्ध अभिनेते दलीप ताहिलसुद्धा ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अडकले होते. दिलीप यांनी दारूच्या नशेत एका रिक्षाचालकाला धडक दिली होती. ज्यामध्ये दोनजण जखमी झाले होते. यावेळी दिलीप यांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र लोकांनी पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

आशुतोष कौशिक (Ashutosh Kaushik)
‘बिग बॉस’ आणि ‘रोडिज’सारख्या प्रसिद्ध शोचा विजेता असलेला आशुतोष कौशिक दारू पिऊन गाडी चालवत असल्याने पोलिसांच्या ताब्यात आला होता. या प्रकरणात आशुतोषचे लायसेन्स रद्द करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याला २५०० रुपयाचा दंड देखील बसला होता. या प्रकरणापासून आशुतोषने त्याला काम मिळत नसल्याचा खुलासा केला होता.

सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla)
‘बिग बॉस १३’चा विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला देखील दारू पिऊन गाडी चालवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आला होत. सिद्धार्थचे या प्रकरणात लायसेन्स रद्द करण्यात आले होते. त्याबरोबर त्याला २००० चा दंड करण्यात आला होता.

निखिल सिद्धार्थ (Nikhil Siddharth)
दाक्षिणात्य सुपरस्टार निखिल सिद्धार्थ दारू पिऊन गाडी चालवत असताना पोलिसांना सापडला होता. यावेळी पोलिसांनी निखिलची गाडी सुद्धा जप्त केली होती.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post