Saturday, April 20, 2024

‘आज माझा रडण्याचा मुड नाही’, सांगितल्यावर दिग्दर्शक आणि आईने वाजवली होती तनुजा यांच्या कानाखाली

बाॅलिवूडच्या दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा (tanuja) यांना ७०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जाते. तनुजा यांनी एकापेक्षा एक असे अनेक हिट चित्रपट दिले. त्यांच्या आई शोभना समर्थ ह्या देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, तर वडील कुमारसेन समर्थ निर्माता होते. आई-वडील दोघेही चित्रपट क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांचाही कल पुर्वीपासूनच अभिनय क्षेत्राकडेच होता. तनुजा यांनी आपली बहीण नूतनसोबत बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण केले. ब्लॅक अँड व्हाईट काळापासून त्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आज २३ सप्टेंबर तनुजा त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी.

तनुजा यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी मुंबईत मराठी कुटुंबात झाला. तनुजा यांनी अगदी लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली, त्या अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसल्या. त्या लहान असतांना खूपच खोडकर आणि मस्तीखोर होत्या. मात्र एकदा असा काही प्रसंग घडला की, त्या पूर्णपणे बदलल्या. १९६० साली तनुजा यांच्या आई शोभना यांनी त्यांना ‘छैल छबीली’ सिनेमातून लाॅन्च केले. तनुजा या खूप खोडकर स्वभावाच्या असल्याने त्या नेहमीच सेटवर धिंगाणा घालायच्या आणि मस्ती करायच्या. तर कधी त्या कोणाची टिंगल करत. परंतू त्यांचे कृत्य त्यांच्या आई-वडिलांना अजिबात आवडत नव्हते.

एकदा तनुजा यांना चित्रपटाच्या सेटवर रडण्याचा सीन करावा लागला, पण तनुजा यांना हसू अनावर झाले आणि त्या पुन्हा पुन्हा हसत होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शर्मा यांनी अनेक वेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू, काहीच घडत नव्हते पुढे तर तनुजा यांना कहरच केला. त्या म्हणाल्या की, “आज माझा रडण्याचा मुड नाही. त्यामुळे आजचे चित्रपटाचे शूटिंग थांबवा.” तनुजा यांचे हे बोलणे ऐकून दिग्दर्शक खूप संतापले आणि सेटवर काम करत असतानाच तनुजा यांच्या जोरात कानाखाली वाजवली.

तनुजा खूप रडू लागल्या. त्यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट झाली. तनूजा रडत रडत त्यांच्या आईकडे गेल्या आणि सर्व प्रकार आईला सांगितला. शोभना यांनी तनुजाचे सर्व ऐकून घेतले आणि त्यांनी देखील त्यांच्या कानाखाली वाजवली. कारण त्यांना माहित होते की, तनुजा कशी आहे. त्यानंतर शोभना यांनी तनुजा यांना हाताला धरून फरफरडत सेटवर नेले आणि म्हणाल्या, “आता सीन शूट करा. ती रडत आहे.” यानंतर तनुजा यांनी परफेक्ट सीन दिला.

पुढे तनुजा यांनी अतिशय हिट सिनेमे दिले. त्यांनी त्यांच्या प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. तनुजा यांनी हिंदी नाही तर मराठीमध्ये देखील सिनेमे केले. पुढे त्यांनी शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केले. त्यांना काजोल आणि तनिषा या दोन मुली आहेत.

काजोलने देखील अभिनयात शिखर गाठले आहे. काजोल एक उत्तम अभिनेत्री बनू शकली, याचे कारण म्हणजे तिची आई. आईला पाहूनच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. म्हणूनच काजोलने  देखील अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. तनुजा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात फिल्म मेकर केदार शर्माच्या ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून केली. तनुजा यांना वाटले की, आपली आई आणि बहीण प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मात्र असे काहीच झाले नाही त्यांना या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती. तनुजा यांनी एक अभिनेत्री म्हणून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात १९६० मध्ये ‘छबिली’ या चित्रपटातून केली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘झलक दिखला जा’च्या सेटवर शिल्पाने मांडल्या वेदना, माधुरीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली अभिनेत्री
सपना चौधरीला बघताच महिलांनी चक्क ट्रकमध्येच धरला ठेका, डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय राडा
पॅपराजींनी राजू यांच्या निधनावर तापसीला विचारला प्रश्न; भडकलेली अभिनेत्री म्हणाली, ‘बाजूला व्हा रे…’

हे देखील वाचा