Saturday, September 7, 2024
Home टेलिव्हिजन शोएब इब्राहिमच्या मालिकेचे शुटिंग सुरू असताना सेटवर घुसला बिबट्या; घटनेनं कलाकारांमध्ये खळबळ

शोएब इब्राहिमच्या मालिकेचे शुटिंग सुरू असताना सेटवर घुसला बिबट्या; घटनेनं कलाकारांमध्ये खळबळ

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. अनेक ठिकाणी बिबट्या हल्ला करत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावर निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी ‘नीरजा‘ या मालिकेच्या सेटवर बिबट्या आला होता. त्यामुळे तेथील वातावरण खूप भीतीदायक झाले होते. आता अभिनेता शोएब इब्राहिमच्या ‘अजुनी‘ या मालिकेच्या सेटवरही असेच काहीसे पाहायला मिळाले.

माध्यमातील वृत्तानुसार, मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. ‘अजुनी’ (ajooni) या मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला होता. शोमध्ये शोएब इब्राहिम आणि आयुषी खुराना मुख्य भूमिकेत आहेत. घटना घडली तेव्हा शोच्या सेटवर 200 लोक उपस्थित होते, परंतु देवाचे आभार मानावे तितके कमीच. कारण बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही. मात्र, बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे वृत्तात सांगितले जात आहे.

‘अजुनी’च्या सेटवर घुसलेल्या या बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे. बिबट्या येताच सेटवर एकच गोंधळ उडाला आणि भीतीमुळे सेटवर उपस्थित लोकांची अवस्था बिकट झाली. यावेळी शोची संपूर्ण टीम सेटवर उपस्थित होती. विशेष म्हणजे, मुंबईतील गोरेगाव परिसरात पसरलेल्या जंगलात बिबट्यांसह इतर वन्य प्राणी आहेत आणि त्यामुळे ते जवळपास राहणाऱ्या लोकांना दिसतात.

अभिनेता शोएब इब्राहिम विषयी बोलायच झाले तर, ‘अजूनी’ मालिकेत शोएब इब्राहिम मुख्य भूमिकेत झळकत आहे. अलीकडेच शोएब वडिल झाला आहे. त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका कक्करने नुकताच एका मुलाल जन्म दिला आहे. दीपिकाने 21 जून रोजी मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव रुहान असे ठेवले आहे. त्यांनी त्याच्या मुलाची झलक युट्युब ब्लाॅगवरून दाखवली आहे. (While shooting of Shoaib Ibrahim’s ajooni serial, a leopard entered the set)

अधिक वाचा- 
सलमानच्या नावे फेक कॉल्स… भाईजानने दिला ‘हा’ थेट इशारा; वाचा काय घडले?
दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा