‘या’ अभिनेत्रींचे झाले पाचव्यांदा लग्न, यावेळेस चक्क बॉडीगार्डसोबतच बांधली लगीनगाठ


आपल्या देशात कलाकार किंवा सामान्य नागरिकांनी चारपेक्षा जास्त लग्न केल्याची उदाहरणं क्वचितच पाहायला मिळतात. मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये ह्या गोष्टी सर्रास घडत असतात. त्या लोकांसाठी अशा गोष्टी खूप सामान्य असतात. मात्र आपल्याला यांबद्दल खूपच जास्त अप्रूप वाटत असते. असेच काहीसे घडले आहे अभिनेत्री पामेला अँडरसनच्या बाबतीत. तुम्हाला पामेला आठवते ना? बिग बॉसच्या घरात काही दिवसांसाठी राहायला आलेली हॉलिवूडची अभिनेत्री… तीच ती पामेला अँडरसन. नुकतेच पामेलाने पाचव्यांदा लग्न केले आहे. प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफसाठी अधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे पामेला.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पामेला अँडरसन हीने पाचव्यांदा लग्न करत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नाताळच्या दिवसाचा योग साधत पामेलाने तिचा बॉडीगार्ड डॅन हेहर्स्ट सोबत लगीनगाठ बांधली आहे. हे लग्न पामेलाच्या राहत्या घरी म्हणजेच कॅनडातील वॅनकुअरमध्ये अगदी खाजगी समारंभात झाले आहे. लग्नानंतर पामेलाने सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त करताना लिहिले, “आता मी अत्यंत योग्य ठिकाणी आहे, माझ्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मिठीत”

पामेला अँडरसनचे वयाच्या ५४ व्या वर्षी हे पाचवे लग्न आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला या दोघांची भेट झाली. त्यानंतर काही महिन्यातच डिसेंबरमध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे त्यांनी त्यांचे लग्न अगदी छोटे आणि मर्यादित स्वरूपात केले. या लग्नाला जास्त लोकं देखील आमंत्रित नव्हते.

पामेलाने सांगितले की, “मी साधारण २५ वर्षांपूर्वी माझ्या आजी-आजोबांचे घर विकत घेतले होते. याच ठिकाणी माझ्या आई, बाबांचेही लग्न झाले होते, आणि आज मी देखील इथेच लग्न केले आहे. त्यामुळे मला माझ्या आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे”.

१९९५ मध्ये पामेलाने तिची पहिली लगीनगाठ अमेरिकन संगीतकार टॉमी लीसोबत बांधली. फक्त चारच दिवसांच्या ओळखीवर या दोघांनी बीच वेडिंग केले. या लग्नाबद्दल पामेलाच्या आईलाही एका मासिकातून माहित झाले होते. तीनच वर्षात म्हणजे १९९८ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

पहिल्या लग्नानंतर पामेला मार्कस शेनबर्ग सोबत रिलेशनशीपमध्ये होती. मात्र त्याचे हे नाते देखील तीनच वर्ष टिकले आणि त्यांनी २००१ मध्ये ब्रेकअप केले. त्यानंतर पामेला कीड रॉक सोबत विवाहबद्ध झाली. मात्र, हे लग्नसुद्धा जास्त टिकले नाही. मग पामेलाने तिसरे लग्न चित्रपट निर्माता रिक सालोमोनसोबत केले. पण वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. पुढे तीने फ्रेंच फुटबॉलपटू आदिल रामी सोबत २०१७ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. पण पुढच्या तीनच वर्षांत हे लग्न देखील संपुष्टात आले. मग तिने जॉन पीटर्ससोबत लग्नाचा निर्णय घेतला. पण नंतर तिने तिचे कायदेशीर लग्न झाले नसल्याचा दावा केला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.