Monday, May 18, 2026
Home टेलिव्हिजन बालिका वधूची गहना आता यशस्वी उद्योजिका; तुरटीच्या व्यवसायातून कमावतेय लाखो-कोटी रुपये

बालिका वधूची गहना आता यशस्वी उद्योजिका; तुरटीच्या व्यवसायातून कमावतेय लाखो-कोटी रुपये

टेलिव्हरींवरील काही मालिका आज ही प्रेक्षकांच्या मनात स्थान करून आहे त्यातील कलाकार आणि कथा यामुळे त्या मालिका इतक्या गाजल्या की आजही लोक त्या मालिकांना विसरू शकत नाही तसेच त्या कलाकारांनाही त्याच भूमिकेच्या नावाने ओळखले जाते. अशीच एक मालिका म्हणजे बालिका वधू या मालिकेला खुप लोकप्रियता मिळाली आणि त्यातील कलाकारांना हि प्रेक्षकांनी खुप प्रेम दिले आहे. तर ‘बालिका वधू’मधील जगिया आणि आनंदी सर्वांना आठवतात, पण तुम्हाला आनंदीची वहिनी, गहना आठवते का? या मालिकेत गहनाची भूमिका टीव्ही अभिनेत्री नेहा मर्दाने हिने साकारली होती. ‘बालिका वधू’मधील गहना, म्हणजेच नेहा मर्दा, आता एक व्यावसायिक बनली आहे. चला तर मग, नेहा मर्दाच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया.

नेहा (neha)मर्दा हिने अनेक मालिका करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तसेच तिने अनेक या मालिकांमुळेच ती घराघरात पोहचली. तर ती आता चर्चेत आली होती, जेव्हा ती तिच्या उत्पादनासह ‘शार्क टँक इंडिया’मध्ये दिसली होती. तसेच या कामाला, कल्पनेने शार्क प्रभावित झाले. फक्त 10 रु मध्ये काम सुरु करुन ती आता या व्यवसाया मधुन करोडो रु कमवत आहे. भिनेत्रीने सांगितले की तिने आपला व्यवसाय तुरटीपासून सुरू केला. ती तुरटी वापरून अंडरआर्म रोल-ऑन बनवते, जे शरीराची दुर्गंधी दूर करते आणि दिवसभर ताजेतवाने ठेवते.

या अभिनेत्रीने काही गोष्टीचा अभ्यास केला, संशोधन केले आणि मग तिने तुरटीवर आधारित अंडरआर्म रोल-ऑन तयार केला. तिच्या मते, रोल-ऑनची गुणवत्ता आणि रचना सुधारण्यासाठी तिने त्याची किंमत 999 रुपयांपर्यंत वाढवली, ज्यामुळे सुरुवातीला ग्राहकांकडून तिच्यावर टीका झाली. मात्र, जेव्हा तिने उत्पादनाबद्दल माहिती दिली, तेव्हा मागणी वाढली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

 

हेही वाचा

अभिनयासाठी UPSCला दिला रामराम; ऐश्वर्या राय सोबत केले काम, पण अभिनेत्याचं करिअर एका बदललं अपघाताने

हे देखील वाचा