Thursday, July 18, 2024

‘विराट, तुला सात खून माफ’, म्हणत बॉलिवूड सेलिब्रिटींनी गायलं विराटचं गुणगान

टी20 विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव करत चाहत्यांना एक अप्रतिम भेट दिली आहे. या सेलिब्रेशनची प्रतिध्वनी फटाक्यांच्या आवाजाने सर्वत्र ऐकू येत आहे, तर बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्मा ही पती विराट कोहली याचा दमदार खेळ पाहून आनंदित झाली आहे. अनुष्का शर्माने विराट कोहलीचा शानदार खेळ आणि भारताच्या ऐतिहासिक विजयावर एक पोस्ट लिहिली आहे, जी व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने विराट कोहलीचे जोरदार कौतुक केले तसेच ती भावूक झाली. या पोस्टसोबतच अनुष्काने विराट कोहलीचे मॅचदरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत.

विराट कोहली (virat kohli)  याचा जबरदस्त खेळ पाहिल्यानंतर अनुष्का शर्मा (anushka sharma) हिने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने विराटचे कौतुक करत लिहिले की, “दिवाळीपूर्वी तुम्ही आज लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला आहात. तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्ती आहेस माझ्या प्रिय. तुमचा खेळ, इच्छाशक्ती सर्वकाही आश्चर्यकारक आहे. मी नुकताच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम सामना पाहिला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

यासोबतच अनुष्का शर्माने पुढे लिहिले, “आमची मुलगी जरी अजून लहान आहे आणि तिला काहीही समजू शकत नाही, पण जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला समजेल की, तिची आई टीव्ही पाहताना आनंदाने का नाचत होती, ती जोरात ओरडत होती. एक दिवस तिला नक्कीच समजेल की, तिच्या वडिलांनी तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ खेळला आहे. त्यानंतर तो पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने बाहेर आला आहे. तुझा खूप अभिमान आहे… परिस्थिती कशीही असो तुझ्यावर कायम प्रेम करते.”

बॉलीवूडचे लेखक जावेद अख्तर यांनीही विराटचे अभिनंदन करत लिहिले की, “विराट, तुला सात खून माफ, खूप खूप धन्यवाद, जगत राहा.”

यावेळी सुष्मिता सेनने लिहिले की, “काय सामना आहे. विराट कोहलीला सलाम. किंचाळताना माझा आवाज गेला.”

अभिनेता अभिषेक बच्चननेही ट्विट करून लिहिले- “किंग कोहली! हे ट्विट आहे. भारताच्या विजयानंतर बॉलिवूडमधील वातावरण स्टार्सच्या या सोशल मीडिया पोस्टवरून स्पष्टपणे दिसू शकते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘या’ दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ‘ब्रह्मास्त्र’

टॉपलेस होऊन उर्फीने चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! युजर्स म्हणाले, ‘हा काय मूर्खपणा’

हे देखील वाचा