Sunday, May 3, 2026
Home बॉलीवूड ‘माझे संपूर्ण हृदय एकाच फोटोमध्ये’, म्हणत अनुष्काने शेअर केला वामिका आणि विराटचा क्युट फोटो

‘माझे संपूर्ण हृदय एकाच फोटोमध्ये’, म्हणत अनुष्काने शेअर केला वामिका आणि विराटचा क्युट फोटो

बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करत असतात. यातच अभिनेत्री अनुष्का शर्मा ही देखील सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अनेकवेळा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या वर्षाच्या सुरुवातीला अनुष्का आई झाली. तेव्हाच तिने ठरवले होते की, ती तिच्या मुलीला सोशल मीडिया आणि लाइमलाईटपासून दूर ठेवणार. तिने अनेकवेळा तिच्या मुलीचे म्हणजेच वामिकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु अजूनही तिने तिच्या मुलीचा चेहरा कोणाला दाखवला नाही. अशातच तिने नुकतेच तिचा पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत एक फोटो शेअर केला आहे.

अनुष्काने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये वामिका आणि विराट दिसत आहे. हा फोटो तिने वामिकाच्या मागून काढलेला असल्यामुळे तिचा चेहरा दिसत नाहीये. ती एका बॉलवर बसलेली दिसत असून, विराट तिला खूप प्रेमाने खेळवताना दिसत आहे. काही वेळा पूर्वी शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. हा फोटो मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे. (actress anushka sharma share photo with vamika and virat on social media)

या फोटोमध्ये वामिकाने क्रीम कलरचा फुलांचा ड्रेस, तर विराटने पांढऱ्या रंगाचा एक टी-शर्ट आणि चष्मा घातलेला आहे.या फोटोमध्ये विराट त्याच्या मुलीसोबत खूप खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करून अनुष्काने कॅप्शन दिले आहे की, “माझं संपूर्ण हृदय एकाच फोटोमध्ये.” तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

अनुष्का सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती पूर्ण वेळ तिच्या मुलीसोबत घालवत आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बॅंड बाजा बारात’, ‘सुई धागा’, ‘परी’, ‘दिल धडकने दो’, ‘झीरो’, ‘सुलतान’, ‘जब तक है जान’, ‘पीके’, ‘ये दिल है मुश्किल’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा