‘मैने प्यार किया’मधील सुमन अर्थात भाग्यश्रीने लावले ५१व्या वर्षीत ‘या’ गाण्यावर ठुमके, फिटनेस पाहून तुम्हीही म्हणाल, ‘बापरे’


जिने तिच्या पदार्पणच्याच सिनेमातून धमाका करत बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री घेतली अशी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. ‘मैने प्यार किया’ सिनेमातून सलमान खानसोबत भाग्यश्रीने अभिनयात यशस्वी पदार्पण केले होते. मात्र पुढे तिला एवढे यश आणि लोकप्रियता मिळूनही तिने लगेच लग्न केले, आणि या इंडस्ट्रीला रामराम केला. त्यानंतर ती अगदीच मोजक्या सिनेमांमधून प्रेक्षकांसमोर आली.

भाग्यश्रीने काही वर्षांनी पुन्हा चित्रपटांमध्ये सहायक भूमिका करायला सुरुवात केली आहे. सध्या भाग्यश्री तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. कधी फिटनेस व्हिडिओ, कधी रेसिपी व्हिडिओ, काही फनी व्हिडिओ किंवा तिचे काही खास फोटोंमुळे ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते.

नुकताच भाग्यश्रीने तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये भाग्यश्री ‘कपूर अँड सन्स’ मधील ‘बुद्धू सा मन है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. जिम ड्रेसमध्ये नाचणारी भाग्यश्री सध्या सोशल मीडियावर चांगलीच भाव खाऊन जात आहे. “weekend vibes” म्हणत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती डान्सच्या करताना व्यायाम करत आहे.

सध्या ५२ वर्षांची झालेली भाग्यश्री लवकरच एका सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.