Tuesday, April 16, 2024

चकचकीत चित्रपटापासून दूर राहिल्या दीप्ती नवल, ‘चमको गर्ल’ बनत चमकवली सिनेसृष्टी आणि मिळवला प्रतिभावान अभिनेत्रीचा टॅग

हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम करून रसिकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली. निरागस चेहरा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या दीप्ती त्यांच्या काळात खूप चर्चेत होत्या. दीप्ती यांनी गणना एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात ताकदवान अभिनेत्रींमध्ये केली जात होती. दीप्ती यांना स्मिता पाटील आणि शबाना आझमी सारख्या अभिनेत्रींच्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे, ज्या आर्ट फिल्म्ससाठी प्रसिद्ध होत्या. दीप्ती गुरुवारी (३ फेब्रुवारी) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. दीप्ती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गीतकार, चित्रकार आणि छायाचित्रकार देखील आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांची अनेक चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

View this post on Instagram

 

A post shared by Deepti Naval (@deepti.naval)

व्यावसायिक चित्रपटांमध्ये नव्हता रस

दीप्ती यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. दीप्ती (Deepti Naval) यांना व्यावसायिक चित्रपटांमध्ये कधीच रस नव्हता. त्यांना आर्ट सिनेमातच काम करायचे आहे, त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच चकचकीत चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवले. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, “त्या काळात मला सर्व प्रकारचे चित्रपट, व्यावसायिक, बी-ग्रेड आणि चांगल्या चित्रपटांची ऑफरही आली होती. पण मला त्या चित्रपटांचे वातावरण आवडले नाही. तेव्हा मला वाटले की, मी फक्त आर्ट फिल्म्सच करेन, ते मलाही जमायचे.”

‘चमको गर्ल’ मधून मिळाली लोकप्रियता 

चमको डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीचा दीप्ती यांना खूप फायदा झाला. चमको वॉशिंग पावडरच्या जाहिरातीत दीप्ती या सेल्स गर्ल होत्या आणि या जाहिरातीतून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. पण ‘चश्मे बद्दूर’ करून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. ती आजही ‘चश्मे बद्दूर’ची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

कोणताही केला नव्हता कोर्स

दीप्ती यांनी अभिनयाचा कोणताही कोर्स केलेला नसून, त्या एक हुशार अभिनेत्री आहेत. आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी ७० हून अधिक चित्रपट केले आहेत. दीप्ती आणि फारुख शेख यांनी ८० च्या दशकात ‘चश्मे बद्दूर’, ‘किसी से ना कहना’, ‘साथ-साथ’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. प्रेक्षकांना त्यांची जोडी खूप आवडली. दोघांचेही एकमेकांशी विशेष अ‍ॅटॅचमेंट असल्याचे बोलले जात होते. दोघांच्या जवळीकीचे किस्सेही चव्हाट्यावर यायचे, पण या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, हे सांगता येत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepti Naval (@deepti.naval)

हेडलाईन पाहून आली चक्कर

एक काळ असा होता की, दीप्ती यांच्यावर वेश्याव्यवसायाचा आरोप होता. अभिनेत्री चित्रपटाशी संबंधित काही गृहपाठ करत होत्या आणि स्वतःच्या घरी पत्रकारांशी बोलत होत्या. अशा परिस्थितीत ती तिच्या फ्लॅटमध्ये आक्षेपार्ह काम करते, असे त्यांच्या सोसायटीतील अनेकांना वाटले. त्यांच्याविरुद्ध तक्रारही करण्यात आली होती. वृत्तपत्र वाचून दीप्ती यांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्या इतक्या घाबरल्या की त्यांनी स्वतःचे घर रात्रभरात खाली केले.

वैयक्तिक आयुष्य आहे ‘असे’ काहीसे

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepti Naval (@deepti.naval)

दीप्ती त्यांच्या चित्रपट कारकिर्दीव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत होत्या. त्यांनी १९८५ मध्ये चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याशी लग्न केले. परंतु २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. प्रकाश झा यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर दिप्ती यांच्या आयुष्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा मुलगा विनोद पंडित आला. त्यांची एंगेजमेंटही झाली होती, पण विनोद पंडित यांचा लग्नाआधीच मृत्यू झाला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा