‘कर्करोगाचे रूग्ण बिचारे नाही, तर ताकदवान’ शस्त्रक्रियाला तीन महिने होताच छवी मित्तलची पोस्ट चर्चेत

0
70
chhavi mittal
Photo Courtesy: Instagram/chhavihussein

अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) नुकतंच तिला स्तनाचा कर्करोग असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. परंतु तिने आता कॅन्सरची ही लढाई जिंकली आहे. कॅन्सरशी लढतानाचे अनुभव, छवी अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. छवीची मित्तलच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया होऊन आता तीन महिने झाले आहेत. अशा परिस्थितीत तिने पुन्हा एकदा कॅन्सरसंदर्भात एक पोस्ट, सोशल मीडियावर शेअर केली आहे.

छवीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हसताना दिसत आहे. यासोबतच, तिने खूप मोठे कॅप्शनही लिहिले आहे. कॅन्सरच्या रुग्णांना नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला, छवीने दिला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज माझे हृदय वेगाने धडधडत आहे, कारण आज माझ्या स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेला तीन महिने पूर्ण झाले आहेत. मी आता खूश आहे आणि माझ्या सकारात्मकतेसाठी मी स्वत:चीच पाठ थोपटत आहे.”

तिने पुढे लिहिलं आहे की, “कॅन्सरचा उपचार हळूवार असला तरी वेळीच निदान झालं तर, या धोकादायक आजाराशी लढा आपल्याला जिंकता येऊ शकतो.” छवीने तिच्या पोस्टमध्ये केसांचा उल्लेख केला आहे आणि लिहिले की, “बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहे. ती म्हणते की, कॅन्सरच्या उपचारात केमोथेरपी (Chemotherapy) दरम्यान केसांवर परिणाम होऊ शकतो पण, त्याचा आत्म्यावर परिणाम होऊ नये.”

पोस्टमध्ये पुढे तिने लिहिले आहे की, “कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेणारे त्यांना बिचारा असं म्हणतात. परंतु मी बऱ्याच कर्करोगाच्या रूग्णांना केमोथेरपी नंतरही काम करताना पाहिलं आहे. तिने म्हटले आहे की, कर्करोगाचे रुग्ण बिचारे नाही तर ताकदवान आहेत.अभिनेत्री छवी मित्तल हिने कॅन्सरवर यशस्वी मात करत अनेकांना प्रेरणा दिली आहे. तिच्या अशा सकारात्मक आणि उत्साही स्वभावामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असल्याच्या कमेंट्स तिच्या या पोस्ट्सवर चाहते करत आहेत.

छवीने ‘कृष्णदासी’, ‘३ बहुरानिया’, ‘घर की लक्ष्मी बेटीयां’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. तिने एसआयटी (SIT) नावाचे यूट्यूब चॅनल देखील सुरू केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

एकाला संधी मिळावी म्हणून घरातले सगळे तडफडतात, पण तिकडं गोविंदाच्या तीन पिढ्या गाजवतायत फिल्मइंडस्ट्री

‘डार्लिंग्स’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया भट्टने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने

‘माझ्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते’, अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करता न आल्याने सनी देओलचे स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here