बॉलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री हुमा कुरेशी लवकरच ‘डबल एक्सएल‘ चित्रपटात दिसणार आहे. तिच्यासाेबतच या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही मुख्य भूमिका साकारली आहे. या दोघेही पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, यासगळ्यांमध्ये हुमा कुरेशीचे मुदस्सर अजीज सोबत ब्रेकअप झाल्याची बातमी समाेर येत आहे.
ब्रेकअपनंतरही दोघांची मैत्री कायम
माध्यमातील वृत्तानुसार, तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हुमा कुरेशी (huma qureshi) आणि मुदस्सर अजीज (mudassar aziz) वेगळे झाले आहेत. सुत्रांनुसार असा दावा करण्यात आला आहे की, ब्रेकअपनंतरही दोघांनी आपली मैत्री कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या विभक्त होण्याचे कारण समोर आलेले नाही. हुमा कुरेशीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून मुदस्सरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
मुदस्सरचे नाव सुष्मिता सेनसोबतही जोडले गेले हाेते
मुदस्सरने त्याच्या डबल एक्सएल या चित्रपटाची स्टाेरी ही लिहिली आहे. मुदस्सरबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘दुल्हा मिल गया’ आणि ‘हॅपी भाग जाएंगे’ यांसारख्या दमदार चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. यापूर्वी त्यांचे नाव सुष्मिता सेनसोबतही जोडले गेले हाेते. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण माध्यमातील वृत्तानुसार, हे नाते 2010 मध्येच तुटले.
View this post on Instagram
हुमा ‘मोनिका ओ माय डार्लिंग’मध्ये दाखवणार अभिनयाची जादू
हुमा कुरेशीच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर हुमा शेवटची ‘बेलबॉटम’मध्ये दिसली होती. ती लवकरच ‘डबल एक्सेल’मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त ती नेटफ्लिक्स चित्रपट ‘मोनिका ओ माय डार्लिंग’मध्येही तिच्या अभिनयाची जादू दाखवताना दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरे वाह! हंसिका माेटवानी डिसेंबरमध्ये ‘या’ व्यक्तीसोबत अडकणार लग्न बंधनात
अर्रर्र! कंगना रणौतमुळे विद्या बालन होऊ शकली नाही ‘इंदिरा गांधी’?