Thursday, September 28, 2023

अमिताभ बच्चनसोबत लग्नानंतर ‘या’ कारणास्तव जया यांनी सोडली इंडस्ट्री; म्हणाल्या, ‘तीन मुलं सांभाळायची…’

बाॅलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. आपापल्या कामात व्यस्त असूनही दोघेही एकमेकांची काळजी घेतात. दोन मुले झाल्यानंतर जया बच्चन यांनी सिनेसृष्टीला रामराम ठाेकला हाेता. अमिताभ आणि जया यांना श्वेता नंदा आणि अभिषेक बच्चन ही दोन मुले आहेत, ज्यांच्या जन्मानंतर त्यांनी चित्रपट जगतापासून ब्रेक घेतला. याबाबत स्वत: जया यांनी मुलाखतीत सांगितले. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…

अभिनेत्री जया बच्चन (jaya bachchan) एका मुलाखतीत म्हणाल्या की, ‘पूर्वीच्या काळात चित्रपटांमध्ये फारसे अॅक्शन सीन नसायचे. हे आता सुरू झाले आहेत आणि आम्ही आता काम करत नाही.’ जया बच्चन पुढे म्हणाल्या, ‘मी अजून काम करायला सुरुवात केलेली नाही. मला सांभाळायला तीन मुलं आहेत. ‘जया बच्चन यांच्या या मुलाखतीला अमिताभ बच्चनही उपस्थित होते. जयाच्या बोलण्यावर बिग बी हसले आणि म्हणाले, ‘आम्हाला दोन मुले आहेत आणि तिसरा मी आहे.’

जया बच्चन आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी रजा घेण्याबद्दल कधीही मागे हटत नाहीत. गेल्या वर्षी, नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टमध्ये जया यांना एका महिलेला तिच्या कुटुंबासाठी काय त्याग करावा लागतो हे विचारले. यावर जया यांनी आक्षेप घेतला आणि म्हणाल्या, ‘मला वाटत नाही की, त्याग हा योग्य शब्द आहे. मी म्हणेन की, तुम्ही दुसऱ्याच्या गरजा, भावना आणि विचार यांना स्वत:पेक्षा जास्त महत्व देता.’ जया पुढे म्हणाल्या, ‘हा त्याग नाही, मला वाटते जेव्हा तुम्ही आतून काही करता तेव्हा ते त्याग नसते.’

जया बच्चन यांनी पुढे काम सोडण्याच्या वेळेची आठवण करून दिली आणि म्हणाल्या,’मला आठवते की, मी जेव्हा काम करणे बंद केले, तेव्हा सर्वजण म्हणत होते की, तिने लग्न आणि मुलांसाठी आपल्या करिअरचा त्याग केला. मात्र, तसे नव्हते. आई आणि पत्नी म्हणून मला खूप आनंद झाला. मी चित्रपटांपेक्षा ती भूमिका जास्त एन्जॉय करत होती.

जया बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, जया लवकरच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.( bollywood actress jaya bachchan revealed why she quit movies after marriage with amitabh bachchan said i have to handle 3 children )

अधिक वाचा-
तमन्ना भाटियाने पॅपराझींनसाेबत केला ‘कावाला’ गाण्यावर डान्स, अभिनेत्रीचे मूव्ह पाहून चाहते झाले वेडे
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा