Wednesday, December 6, 2023

‘हप्पू की उलटन पलटन’ फेम कामना पाठक अडकली लग्नबंधनात, ‘या’ अभिनेत्यासोबत घेतल्या साताजन्माच्या गाठी

सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये लगनसराइ सुरु झाली आहे. यंदा अनेक जोडप्यांनी आपल्या नात्याला लग्नबंधनात अडकवले आहे. नुकतंच मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध जोडपं राणा दा आणि पाठक बाइ म्हणजेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा लग्न सोहळा थाटामाटात पुण्यामध्ये पार पडला. त्याशिवाय बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही लग्न उरकलं आहे. आता या यादीमध्ये अजून एका अभिनेत्रीचे नाव समोर येत आहे.

‘हप्पू की उलटन पलटन’ (Happu Ki Ultan Palatan) फेम अभिनेत्री कामना पाठक (Kamna Pathak) हिचा लगीन सोहळा शुक्रवार (दि,9 डिसेंबर) रोजी गुपचुप पार पडला आहे. तिने तिचा प्रियकर अभिनेता संदीप श्रीधर (Sandip Shridhar) सोबत लग्नगाठ बांधली आहे. हा लग्न सोहळा मराठी पारंपारिक पद्धतीने पार पडला. 4 दिवसांपासून लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले होते. दोन दिवस मेहंदी कार्यक्रम आणि हळदी समारंभ थाटामाटात पार पडला.

अभिनेत्रीने लग्नामध्ये पांढऱ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी घागरा परिधान केला होता त्यासोबतच संदीपणे घागऱ्याला शेभेल अशी पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली असून फेटादेखिल बांधला होता. या लग्नामध्ये जवळचे कुटुंब नातेवइक आणि इंडस्ट्रीमधील जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. नागपूरमधील थाटामाटात हा लग्न सोहळा पार पडला.

kamna pathak

कामना पाठक हिने तिचा पती म्हणजेच संदीप श्रीधरचे कौतुक करत सांगितले की, “आम्ही गेल्या काही वर्षापसून एकमेकांना ओळखत आहोत आणि आमची खूप चांगली मैत्री देखिल आहे. कालांतराने आमच्‍यामध्‍ये प्रेम बहरू लागलं. संदीप खूप काळजी घेणारा व प्रोत्‍साहन देणारा आहे. त्‍याच्‍या या स्‍वभावामुळेच आमच्‍यामध्‍ये जवळीक निर्माण झाली आणि मी त्‍याच्‍या प्रेमात पडले. आम्‍हा दोघांना आमच्‍या कलेप्रती प्रेम व आवड आहे, ज्‍यामुळेच आम्‍ही एकत्र आलो. आम्‍ही पती-पत्‍नी म्‍हणून आमच्‍या नवीन जीवनप्रवासाला सुरूवात करण्‍यास खूपच उत्‍सुक आहोत.” संदीप आणि कामनाच्या लग्नामध्ये तिने त्यांची लव्ह लाइफ सांगितली असून दोघांमध्ये खूप चांगले आहे असे देखिल सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
उत्तराखंडचा जावई बनला ‘मामाजी’, देहरादूनमध्ये गुपचुप उरकला विवाह सोहळा
ब्रेकिंग! ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा