Friday, April 19, 2024

मोठी बातमी! ट्विटर अकाउंट निलंबित झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला आणखी एक झटका, पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. ती आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखली जाते. सध्या ती खूपच चर्चेत आहे. नुकतेच तिचे ट्विटर अकाउंट कायमचे निलंबित करण्यात आले आहे. अशातच आता मोठी बातमी येत आहे की, कंगनाला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे. तिने एक दिवसापूर्वीच कोरोनाची टेस्ट केली होती, ज्यानंतर शनिवारी (८ मे) तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तिने म्हटले आहे की, ती घरातच क्वारंटाईन आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे.

कंगनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला मागील काही दिवसांपासून खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवत होता. माझ्या डोळ्यांमध्ये जळजळ होत होती. मला हिमाचल प्रदेशात जाण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करायची होती आणि मी ती काल केली. आज याचा निकाल आला आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मी स्वत: ला क्वारंटाईन केले आहे. मला याचा काहीच अंदाज नव्हता की, व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करत आहे.”

व्हायरसला स्वत:वर वर्चस्व गाजवू देऊ नका
कंगनाने पुढे लिहिले की, “आता मला हे माहिती झाले आहे की, मी लवकरच याला नष्ट करेल. तुम्ही या व्हायरसला स्वत:वर वर्चस्व गाजवू देऊ नका. जर तुम्ही याला घाबरला, तर तो तुम्हाला आणखी भीती दाखवेल. चला तर या कोरोना व्हायरसला पराभूत करूया. हे जास्त काही नाही फक्त एक थोडा वेळ राहणारा ताप आहे, ज्याला खूप ताकद मिळत आहे आणि तो लोकांना भीती दाखवत आहे. हर हर महादेव.”

ट्विटर ब्लॉक झाल्यानंतर इतर प्लॅटफॉर्मवर सक्रिय
देशातील प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने आपले मतत मांडणारी अभिनेत्री कंगनाला सध्या खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे. नुकतेच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिचे ट्विटर अकाउंट निलंबित केले होते. त्यानंतर कंगना आपले मत इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त करत आहे.

धर्माची आवश्यकता
कंगनाने शुक्रवारी (७ मे) आपल्या एका पोस्टमध्ये दिल्लीमध्ये बर्बाद केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनबाबत लिहिले होते. तिने म्हटले होते की, “भारताला ऑक्सिजनची आवश्यकता नाहीये. याला धर्माची आवश्यकता आहे आणि लोकांना देवाची भीती वाटली पाहिजे. गिधाडांनो लाज वाटूद्या.”

याव्यतिरिक्त तिने लिहिले की, “आपल्या देशात इतके चोर आहेत की, येथे ऑक्सिजन नाही, तर माणुसकीला प्रामाणिकपणाची आवश्यकता आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र

-काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल

हे देखील वाचा