Sunday, May 19, 2024

करीनाच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक लीक; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. करीना लवकरच दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंग ती लंडनमध्ये करत आहे. ती काही दिवसांपूर्वीच लंडनला रवाना झाली होती. आता करीनाच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करीनाचा लूक पाहायला मिळत आहे.

चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर नाही
करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिच्या या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा हाेत आहे. अनेक यूजर्स एक एक करून अभिनेत्रीचा हा लूक शेअर करत आहेत. अनेकजण तिच्या लूकचे कौतुकही करत आहेत. मात्र, अद्याप या चित्रपटाचे नाव निर्मात्यांनी जाहीर केलेले नाही. पण, करीनाचा लूक लीक झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटा संदर्भात खळबळ उडाली आहे.

करीना साकारणार गुप्तहेराची भूमिका
माध्यमांतील वृत्तानुसार, करीना या चित्रपटात गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट हत्येच्या रहस्याभोवती फिरताना दिसणार आहे, ज्यामध्ये करीना हे गूढ रहस्य उकलण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. करीनाला पहिल्यांदाच अशा पात्रात पाहण्यासाठी अभिनेत्रीचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

फाेटाेवर चाहते करत आहे प्रेमाचा वर्षाव
व्हायरल व्हिडिओमध्ये, करीना उंच पोनी टेल आणि काळ्या रंगाच शर्ट आणि पँटसह जॅकेटमध्ये दिसत आहे. तिचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. करीनाने फॉर्मल शूज घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. तीला याआधी अशा लूकमध्ये कधीही पाहिले नाही. अनेक यूजर्स तिच्या या पाेस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. करीनाला फॉर्मल लूक खूपच छान दिसत आहे. हा चित्रपट एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. याआधी करीना आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये दिसली होती, जे नुकतेच ओटीटीवर स्ट्रीम झाले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
जलवा! लॅक्मे फॅशन वीकमध्ये ‘या’ अभिनेत्रीने केला फूल कॉन्फिडेंसमध्ये रॅम्प वाॅक

साेनमचा मुलाला स्तनपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या चाहते का करत आहेत काैतुक

हे देखील वाचा