Sunday, June 23, 2024

बापरे! करीनाने ‘या’ चित्रपटात परिधान केले होते तब्बल 130 ड्रेस, एकदा वाचाच

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. करीनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. करीना सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे आउटफिट नेहमीच चर्चेत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की करीना कपूर खानने एका चित्रपटात इतके कपडे परिधान केले होते की त्याचा विक्रम झाला?

करीना कपूर (Kareena Kapoor) खानने 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरोईन’ या चित्रपटात एकूण 130 ड्रेस परिधान केले होते. या चित्रपटात करीना कपूर खानने एक बॉलीवूड अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिच्या भूमिकेनुसार तिने विविध प्रकारचे कपडे परिधान केले होते. हे कपडे जगातील सर्वात मोठ्या ड्रेस डिझायनर्सनी बनवले होते.‘हिरोईन’ हा चित्रपट त्याच्या उच्च बजेटसाठी देखील प्रसिद्ध आहे. हा आतापर्यंतच्या सर्वात महागड्या बॉलीवूड चित्रपटांपैकी एक आहे.हा चित्रपट 21 सप्टेंबर 2012 रोजी करीना कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शित झाला होता.

करीना कपूर खानच्या ‘हिरोईन’ चित्रपटातील कपडे तिच्या फॅशन सेन्सचे उत्तम उदाहरण आहेत. तिने या चित्रपटात विविध प्रकारच्या कपडे परिधान केले होते, ज्यात साडी, वेस्टर्न ड्रेस, आणि पार्टी ड्रेस यांचा समावेश होता. तिचे हे कपडे तिच्या भूमिकेला पूर्ण न्याय देतात. करीना कपूर खानच्या ‘हिरोईन’ चित्रपटातील कपडे आजही लोकप्रिय आहेत. अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्स तिच्या या कपड्यांचे अनुकरण करतात.

‘हिरोईन’ या चित्रपटात करिनासोबत अर्जुन रामपाल, रणदीप हुड्डा आणि राकेश बापट यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय शहाना गोस्वामी, दिव्या दत्ता, हेलन, शिल्पी शर्मा, मुग्धा गोडसे आणि लिलेट दुबे देखील या चित्रपटात दिसल्या आहेत. ‘हिरोईन’च्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, ही एका अभिनेत्रीची कथा आहे. जिला इंडस्ट्रीत अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आपले करिअर वाचवण्यासाठी तिने असे पाऊल उचलले की तिला पश्चाताप करावा लागेल. (Actress Kareena Kapoor Khan wore as many as 130 dresses in the movie Heroine)

आधिक वाचा-
‘मन मतलबी’ गाण्यातून उलगडणार मनातील व्यथा; ‘शॅार्ट ॲन्ड स्वीट’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित
अभिनेत्री उर्फी जावेदने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘मी घरात नग्नावस्थेत वावरते कारण…’

हे देखील वाचा