बॉलिवूड कलाकारांची मुलं नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. यामध्ये करीना कपूर खान हिचा मुलगा तैमूर अली खान याचा आणि तिची ननंद तसेच अभिनेत्री सोहा अली खान हिची लेक इनाया नौमी खेमू हिचाही समावेश होतो. खरं तर, सोहा आणि अभिनेता कुणाल खेमू यांची लेक इनाया गुरुवारी (दि. 29 सप्टेंबर) रोजी आपला 5वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास क्षणी करीनाने आपल्या भाचीसाठी एक खास विश शेअर केली आहे. यासोबतच तिने इनाया आणि तैमूरचा एक फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शनही दिले आहे.
करीनाची पोस्ट
अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “माहिती नाही तुम्ही दोघे प्रार्थना का करत आहात? तुम्हाला आज जे काही हवं आहे, ते तुम्हाला मिळावं. तुम्हा दोघांनाही खूप केक खायला मिळो. ठीक आहे, तुमची आई हे वाचत आहे आणि मला मारणार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा राजकुमारी इनाया. तुला खूप खूप प्रेम.”
View this post on Instagram
करीनाच्या या पोस्टला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे. करीनाच्या या पोस्टवर तिची ननंद सबा पतौडी हिने कमेंट करत लिहिले की, “लोल, मुंचकिन्सवर प्रेम कर देवा. 5व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इन्नी जान.”
हेही वाचा- गुन्हा कबूल करणार की नवा डाव खेळणार? ‘दृश्यम 2’ चित्रपटाचा थरारक टिझर आला समोर
सोहा अली खान (Soha Ali Khan) हिची बहीण सबाने इनाया नौमी खेमू (Inaaya Naumi Kemmu) हिचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, “इन्नी जान. एक ते चारपर्यंत आणि आता तू 5 वर्षांची झाली आहेस. हे वर्ष किती पटापट गेले. 5व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इन्नी जान. तुझी मावशी तुझ्यावर खूप प्रेम करते. नेहमी सुरक्षित राहा आणि काळजी घे.”
View this post on Instagram
सोहा अली खान दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर आणि पतौडीचे दिवंगत नवाब मन्सूर अली खान यांची मुलगी आहे. मन्सूर अली खान हे भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक होते. सोहा हिने अनेक सिनेमात काम केले आहे. तिला ‘रंग दे बसंती’, ‘मुंबई मेरी जान’, ‘दिल मांगे मोर’, ‘खोया कोया चांद’, ‘साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स’ आणि ‘घायल: वन्स अगेन’ यांसारख्या अनेक सिनेमांसाठी ओळखले जाते.
सोहाने अभिनेता कुणाल खेमू (Kunal Kemmu) याच्यासोबत 2015मध्ये संसार थाटला होता. या दोघांना इनाया नावाची मुलगी आहे. कुणाल मागील काही वर्षांमध्ये ‘मलंग’, ‘लूटकेस’ यांसारख्या सिनेमात झळकला आहे. तसेच, त्याने ‘अभय’ या वेबसीरिजमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 4 वर्षांनंतर रणवीर अन् दीपिकाचं बिनसलं? वेगळे होण्याच्या बातम्यांवर स्पष्टच बोलला ‘एनर्जी किंग’
दु:खद! ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायकाचे निधन, वयाच्या 59व्या वयात घेतला जगाचा निरोप