Thursday, July 18, 2024

नवाबी थाट सोडून शेतात घाम गाळतोय करीनाचा लाडका तैमूर; नेटकरी म्हणाले, ‘मुळ्याच्या शेतात ससा’

आपल्या सिनेमांव्यतिरिक्त कलाकार इतर कुठल्या ठिकाणी सक्रिय असतील, तर ते म्हणजे सोशल मीडियावर. या कलाकारांमध्ये अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या नावाचाही समावेश होतो. करीना कपूर हिचा सोशल मीडियावर मोठा वावर आहे. ती दरदिवशी तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती तिच्या कुटुंबाचे फोटोही शेअर करते. तिची दोन्ही मुलं तैमूर अली खान आणि जेह हेदेखील लाईमलाईटमध्ये असतात. नुकतेच करीनाने तैमूरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो शेतात दिसत आहे. त्याचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तैमूर अली खान (Taimur Ali Khan) याचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने तैमूरचे तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तैमूर शेतात उभा असल्याचे दिसत आहे आणि त्याच्या हातात मुळ्याची पाने आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोत तो मुळ्याची पाने तोडताना दिसत आहे. शेतात काम करताना तैमूर खूपच क्यूट दिसत आहे.

तैमूरचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. हे फोटो शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “दुपारच्या जेवणासाठी दहीसोबत गरम गरम मुळ्याचे पराठे.” करीनाने हॅशटॅगमार्फत हेही स्पष्ट केले आहे की, तिचा मुलगा तिच्या घरात उगलेल्या भाज्या तोडत आहे.

चाहत्यांनाही हे फोटो आवडले आहेत. विशेष म्हणजे, कलाकारांनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सेलिब्रिटी डायटिशन ऋतुजा दिवेकर हिने पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, तैमूरची आत्या सबा पतौडीने कमेंट करत लिहिले की, “खूप अभिमान.” एका युजरने लिहिले की, “तैमूर हा भविष्यातील राजा आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “मुळ्याच्या शेतात ससा.”

करीना आणि सैफ अली खान हे आपल्या दोन्ही मुलांसोबत पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. मध्यंतरी हे कुटुंब परदेशात फिरायला गेले होते. तिथेही करीनाने खूप मजामस्ती केली होती. दुसरीकडे, करीनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात झळकली होती. या सिनेमात तिच्यासोबत आमिर खान हा मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनालीला न्याय मिळावा म्हणून लढतेय तिची लेक; म्हणाली, ‘मुख्यमंत्र्यांनी विश्वास देऊनही सीबीआय तपास नाहीच’
विल स्मिथची झापड अजूनही विसरला नाही ख्रिस रॉक! घेतला मोठा निर्णय, घडणार का अनर्थ?
धक्कादायक! आईसाठी औषधे घेऊन जात असताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात घेतोय उपचार

हे देखील वाचा