Tuesday, June 25, 2024

‘पोलीस महानालायक असतात…’ पुणे अपघाताबाबत केतकी चितळेची पोस्ट व्हायरल

पुण्यातील कल्याणनगर येथे काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एका श्रीमंताच्या मुलाने आपल्या कारच्या धडकेने दोन लोकांना धडक दिली. त्यांनी जागीच आपला प्राण गमवावा लागला. या घटनेनंतर जगभरात संतप्त असे वातावरण निर्माण झालेले आहे. हा अपघात झाल्यानंतर मुख्य आरोपीला काही तासातच जामीन देखील मिळालेला आहे. त्याचप्रमाणे हाती आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या आरोपी मुलाला पिझ्झा आणि बर्गर देखील खाण्यास दिलेला आहे. आता या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळे हिने तिचे वक्तव्य केलेले आहे. केतकी नेहमी समाजातील विविध घटकांवर तिचे मत मांडत असते. यावेळी देखील तिने एका व्हिडिओमार्फत तिचे मत मांडलेले आहे.

पुण्यातील अपघात प्रकरणावर एका व्हिडिओ माध्यमातून तिचे मत व्यक्त केलेले आहे. या व्हिडिओमध्ये केतकी पुण्यातील पोलिसांवर संताप व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये केतकी म्हणत आहे की, “आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना 16 साडेसोळा तास उपाशी ठेवले जाते. एक किलोमीटर अंतरापर्यंत वडापाव आणि पावभाजीची गाडीच नाही. त्यामुळे तुझ्यासाठी खायला अन्न शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तेव्हा 16 तास मी उपाशी होते आणि आता रात्री तीन वाजता या लाडवलेल्या मुलासाठी पोलीस बर्गर आणि पिझ्झा देत होते. असा संताप तिने व्यक्त केलेला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न पोलिसांचा फसलेला आहे.”

“तो मुलगा तिथे बसून आरामात खात आहे त्याचे सगळे लाड पुरवले जात आहे. असा लाडवलेल्या बाळांना बर्गर दिला जातो आणि आमच्या सारख्या सामान्य लोकांना मात्र उपाशी ठेवलं जातं.” असा संताप देखील घेतली तिच्या या पोस्टमधून व्यक्त केलेला आहे.

या व्हिडिओमध्ये केतकी असे म्हणताना दिसत आहे की “ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि त्या अल्पवयीन मुलाची काहीही चूक नव्हती. असा पोलिसांनी प्लॅन करायचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा हा प्लॅन फसलेला आहे. पोलीस महानालायक असतात. हे आपल्याला माहित आहे. तसेच हे लोक या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करायला गेले होते. त्यांनाच पोलिसांनी आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं होतं ही गोष्ट नवीन नाहीये.”

केतकीने केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्याचप्रमाणे अनेकजण तिला पाठिंबा देताना देखील दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

फराह खानने बॉलीवूडच्या सर्वात कंजूस अभिनेत्याचा केला खुलासा; म्हणाली, ‘मला 500 रुपये द्या…’
माही विज बनली कास्टिंग काउचची शिकार, रेट कार्ड बनवल्यानंतर आला क्रूझवर जाण्याचा प्रस्ताव

हे देखील वाचा