जेठालालची सासू सापडली! आता तुम्हीही पाहू शकाल दया भाभीच्या आईचा चेहरा?


टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. यामध्ये गोकुळधाम सोसायटीध्ये एकोप्याने राहणाऱ्या लोकांची कहाणी दाखवली आहे. या मालिकेची कहाणी जेठालाल आणि दया बेन यांच्या परिवाराच्या भोवती फिरते. प्रेक्षक देखील या जोडीला खूप प्रेम देत असतात. परंतु आता ते दोघे या मालिकेत सोबत नाहीत. मागील बरेच दिवसांपासून दया बेनचे पात्र निभावणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने ब्रेक घेतला आहे. त्यानंतर ती या मालिकेत पुन्हा दिसली नाही. ती परत कधी या मालिकेत येणार आहे, याबाबत कोणालाही माहिती नाहीये. मागील काही दिवसांपूर्वी तिने हा शो सोडल्याची देखील माहिती समोर आली होती. पण जर तुम्हाला असे सांगितले की, दया बेन‌ नाही, तर तिची आई या शोमध्ये दिसणार आहे, तर तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. (Actress Ketaki Dave wish to play role of Jethalal’s mother in low In Taarak Mehta ka ooltah chashma)

दया बेन ही नेहमीच तिच्या आईसोबत फोनवर बोलताना दिसत होती. ती अहमदाबादमध्ये राहत होती. तिच्या आईचा चेहरा अजूनही समोर आला नाहीये. परंतु प्रत्येक भागात तिचे नाव घेतले जात होते. ती जेठालालची नवनवीन अतरंगी नावे देखील ठेवत असते. त्यामुळे जेठालालला तिचा खूप राग येत असतो. परंतु आता कदाचित तुम्हाला त्यांना बघण्याची संधी मिळू शकते. अभिनेत्री केतकी दवे हिने जेठालालची सासू आणि दया बेनची आईची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

केतकी दवे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकेत आणि चित्रपटात काम केले आहे. तिने मजेशीर भूमिका निभावली आहेत. तिने देखील दया बेनप्रमाणे प्रेक्षकांना खूप हसवले आहे. केतकी दवे ही तीच अभिनेत्री आहे जिने ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ या चित्रपटात जॉनी लिव्हरच्या पत्नीचे पात्र निभावले होते. तिने अनेक पात्र निभावून प्रेक्षकांना हसवले आहे.

केतकीची कॉमिक स्टाईल आणि टायमिंग दया बेनप्रमाणे आहे. तिने अनेक गुजराती चित्रपटात काम केले आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेने केतकीला खूप लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये तिने दक्षा विराणी हे पात्र निभावले होते.

केतकी दवेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जर तिला हे पात्र मिळाले, तर ती नक्कीच काम करेल. काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की, केतकी दया बेनच्या आईची भूमिका निभावणार आहे. परंतु हे खरे नव्हते. मात्र, आता केतकीने स्वतः हे पात्र निभावण्याची इच्छा जाहीर केली आहे. परंतु आता केतकी दवे ही ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत काम करेल की नाही, हे आता येणारा काळंच सांगेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.