वाढदिवशी क्रिती सेननने चाहत्यांना केले खुश; एवढ्या धावपळीतही दिली त्यांना सेल्फी


बॉलिवूडमधील अत्यंत हॉट, बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन. ती मंगळवारी (२७जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा हा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास आहे. कारण तिचा ‘मिमी’ हा चित्रपट तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २६ जुलैला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट खरंतर ३० जुलैला प्रदर्शित होणार होता पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट ४ दिवस आधीच प्रदर्शित करून सगळ्यांना सरप्राइज दिले आहे.

बॉम्बेटाईम्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, क्रिती सेनन पांढऱ्या रंगाची हुडी आणि शॉर्ट्समध्ये तिच्या गाडी शेजारी उभी राहिलेली दिसत आहे. तिने चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसत आहे. तिथेच पॅपराजी तिला फोटोसाठी पोझ देण्यासाठी सांगतात. ती देखील त्यांना फोटो देते.

तेवढ्यात तिचे काही चाहते तिथे येतात. ते देखील जेव्हा तिला फोटोसाठी विचारतात, तेव्हा ती त्यांना नाही न म्हणता सेल्फी देते. एकानंतर एक असे चाहते येऊन तिच्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. अनेकवेळा कलाकार त्यांच्या चाहत्यांकडे दुर्लक्ष करून जात असतात, पण क्रितीने मात्र असं न करून चाहत्यांना मनात तिच्याबाबत आणखी प्रेम जागे केले आहे. (Kriti sanon give a selfie to her fans on her birthday)

क्रिती सेननने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिचे स्थान प्रस्थापित केले आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिने २०१४ साली ‘हीरोपंती’ या चित्रपटातून टायगर श्रॉफसोबत पदार्पण केले आहे. यानंतर तिने ‘राबता’, ‘लुक्का छुप्पी’, ‘दिलवाले’, ‘हाऊसफुल ४’, ‘पानिपत’, ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’

-जेव्हा ६४ वर्षीय ‘बिग बीं’नी १९ वर्षाच्या अभिनेत्रीसोबत केलं होतं लिप-लॉक, चाहत्यांमध्ये पसरली होती तीव्र नाराजी

-जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….


Leave A Reply

Your email address will not be published.