अर्रर्रर्र! जेव्हा नाचता नाचता स्टेजवर धाडकन पडली सपना चौधरी, बघण्यासारखी होती प्रेक्षकांची रिऍक्शन

सपना चौधरी तिच्या धमाकेदार डान्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. हेच कारण आहे की, तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अलीकडेच सपनाचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ती घसरते आणि स्टेजवर पडताना दिसत आहे. सपनाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही खूप निराश दिसत आहेत.

सपनाचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल
सपनाचा हा थ्रोबॅक डान्स व्हिडिओ यूट्यूबवर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. सपनाचा परफॉर्मन्स चांगला चाललेला असतो की, अचानक एक पाऊल टाकताना तिचा तोल बिघडतो आणि ती जोरात स्टेजवर पडते. सपना अचानक पडल्याने प्रेक्षकही आश्चर्यचकित झालेले पाहायला मिळतात. पण काही सेकंदातच सपना पूर्ण आत्मविश्वासाने उभी राहते आणि पुन्हा नाचू लागते. व्हिडिओमध्ये दिसणारी गर्दी पाहून तुम्हाला समजलेच असेल की, सपनाची फॅन फॉलोविंग बरीच मजबूत आहे. (sapna choudhary fell on stage while dancing)

नुकतंच सपनाचं नवीन गाणं ‘पतली कमर’ रिलीझ झालं आहे आणि रिलीझ होताच या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसात या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे यूके हरियाणवी या गायकाने गायले आहे. या गाण्याला जीआर यांनी संगीत दिले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे दिग्दर्शन पवन गिल यांनी केले आहे.

हरियाणवी डान्सर सपना चौधरी ‘बिग बॉस’चा देखील भाग राहिली आहे. या शोमध्ये सपनाला चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र, शोमध्ये त्याचा प्रवास फार काळ टिकला नाही. तिने ‘नानू की जानू’, ‘वीरे की वेडिंग’, ‘जर्नी ऑफ भाँगओवर’, ‘एक तू एक मै’, ‘सपना चौधरी सॉन्ग लिस्ट’, ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ अशा चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा कडकच ना! सपना चौधरीचे ‘पतली कमर’ गाणे रिलीझ; मिळाले १० लाखांपेक्षाही अधिक हिट्स

-सपना चौधरीच्या डान्सने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?

-पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये सपना चौधरीचे देसी स्टाईलमध्ये फोटोशूट, साधेपणाने जिंकले चाहत्यांचे मने

Latest Post