अनेकदा बॉलिवूड सौंदर्यवतींचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकवेळा हे व्हिडिओ इतके चर्चेत असतात की, ते चाहत्यांच्या मनात दीर्घकाळ टिकून राहतात. असाच एक व्हिडिओ मलायका अरोरा (Malaika Arora) हिचा एका शोदरम्यानचा आहे. या शोमध्ये मलायका एवढा पारदर्शक ड्रेस परिधान करून आली होती की, हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा आहे हा व्हिडिओ
मलायका दीर्घकाळापासून ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोशी जोडली गेली आहे. ती या शोमध्ये परीक्षक आहे. या शोदरम्यान मलायका पारदर्शक गाऊन परिधान करून पोहोचली होती. विशेष म्हणजे, मलायका या ड्रेसमध्ये इतकी कम्फर्टेबल होती की, ती स्टंट करतानाही दिसली.
मलायका डोक्यावर पाण्याचा कप घेऊन दिसली फिरताना
या शोमध्ये अनेक स्पर्धक त्यांचे अनोखे कौशल्य दाखवतात. यादरम्यान, मलायकाही काहीतरी नवीन करण्याचा विचार करते आणि पाण्याने भरलेला कप डोक्यावर ठेवून डोळे बंद करते आणि इकडे तिकडे फिरू लागते.
मलायका दिसली सिल्व्हर गाऊनमध्ये
या शोमध्ये मलायकाने चंदेरी रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता. खास गोष्ट म्हणजे तिचा ड्रेस इतका पारदर्शक होता की, तिचे आतील कपडेही दिसत होते.
आधीही झाली आहे ऊप्स मोमेंटची शिकार
मलायका याआधीही ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे. कधी तिच्या पेहरावामुळे, तर कधी कार्यक्रमादरम्यान झालेल्या अपघातांमुळे तिला ऊप्स मोमेंटचा सामना करावा लागला आहे.
अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे मलायका अरोरा
मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अलीकडेच हे दोन्ही कलाकार मालदीवमध्ये सुट्टी घालवून परतले आहेत. जिथून या दोन कलाकारांनी त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याआधीही मलायका आणि अर्जुन अनेकदा मालदीवमध्ये व्हेकेशनसाठी एकत्र गेले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, या दोन कलाकारांचे व्हॅकेशनचे आवडते ठिकाण मालदीव आहे.
हेही वाचा-