देशभरात सध्या एक विषय चांगलाच रंगला आहे. तो म्हणजे, शाहरुख खान याच्या ‘पठाण‘ या सिनेमातील ‘बेशरम रंग‘ या गाण्यावरून. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण ही भगव्या रंगाच्या बिकिनीत दिसत आहे. याच बिकिनीत तिने शाहरुखसोबत रोमान्स केला आहे. यामुळे भलताच वाद उफाळला आहे. अशात हा वाद निवळला नाही, तोच एका भोजपुरी अभिनेत्रीने भगव्या रंगाची बिकिनी घालून ‘पठाण’ सिनेमातील गाण्यावरील व्हिडिओ शेअर केलाय.
कोण आहे ती अभिनेत्री?
ही अभिनेत्री इतर कुणी नसून नम्रता मल्ला (Namrata Malla) आहे. नम्रताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत नम्रता मल्ला भगव्या रंगाच्या बिकिनीत समुद्रामध्ये डान्स करताना दिसतेय. यात ती ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होतोय, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
नम्रताच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिच्या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 19 हजारांहून अधिक चाहत्यांनी या व्हिडिओवर पसंतीही दर्शवली आहे. याव्यतिरिक्त शेकडो चाहते कमेंट्स करत प्रतिक्रिया देत आहेत.
नम्रताच्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस
अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. काहींनी तिचे कौतुक केले आहे, तर काहींनी तर तिला भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे जोरदार ट्रोलही केले आहे. एकाने लिहिले की, “जरा लाज वाटू दे, तुला भगवे कपडेच मिळाले होते का?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “भारतात भगव्या रंगाची बिकिनी बंद आहे, कळत नाही का तुला?” आणखी एकाने म्हटले की, “पाण्यात आग लावून टाकली.” एकाने असेही म्हटले की, “तू खूपच स्टनिंग दिसत आहे.”
View this post on Instagram
नम्रता मल्ला ही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिला इंस्टाग्रामवर 16 लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळेच कदाचित तिच्या फोटो आणि व्हिडिओला हजारो लाईक्सचा मिळतात.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाजप खासदार अन् अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचे आगमन, स्वागताचा झक्कास व्हिडिओ पाहाच
‘माझी मुलं मुस्लिम हाेणार की हिंदू…’, जिम ट्रेनरशी लग्न केल्यानंतर अभिनेत्री ट्राेल, देवाेलिनानं दिलं चाेख उत्तर










