Monday, July 15, 2024

मोठमोठ्या सेलिब्रिटी हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये विसरल्या होत्या त्यांच्या मुलांना, जेव्हा कळाले तेव्हा…

कलाकारांचे आयुष्य किती व्यस्त असते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कुठल्याही चित्रपटाचे किंवा प्रोजेक्टचे सतत शूटिंग, मुलाखती, पार्ट्या यांमध्ये कधीकधी सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यात इतके मग्न होतात की, ते त्यांच्या मुलांनाही विसरतात. आता याला चूक म्हणा किंवा काहीही म्हणा. पण अनेक कलाकारांच्या बाबतीत असे घडले आहे की, ते आपल्या मुलांना अनेकदा विसरले आहेत. काहीजण आपल्या मुलाला किंवा मुलीला हॉटेलमध्ये विसरले आहेत, तर काही रेस्टॉरंटमध्ये तुमचा विश्वास बसत नाही, बरोबर? चला तर मग या सेलिब्रिटींची यादी जाणून घेऊया…

ताहिरा कश्यप (Tahira Kashyap)
आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप भलेही अभिनेत्री नसेल, पण ती वेगवेगळ्या प्रकारे चित्रपट इंडस्ट्रीशी जोडलेली आहे आणि कामात खूप व्यस्त असते. या व्यस्त वेळापत्रकात एकदा ताहिरा आपल्या मुलाला रेस्टॉरंटमध्ये विसरली होती. याचा खुलासा खुद्द ताहिराने एका मुलाखतीत केला होता. ताहिराने सांगितले होते की, एकदा ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवायला गेली होती आणि रेस्टॉरंटमध्येच आपल्या मुलाला विसरली होती.

नेहा धुपिया (Neha Dhupia)
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. नेहा आपल्या मुलांची खूप काळजी घेते. परंतु असे असतानाही ती आपल्या मुलीला विसरली होती. एका मुलाखतीत नेहाने सांगितले होते की, अंगद आणि ती एकदा लाँग ड्राईव्हवर गेले होते आणि आपल्या मुलीला घरी विसरले होते. नर्सने फोन करून बाळ रडत असल्याचे सांगितल्यावर मुलगी नर्ससोबत असल्याचे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. पण दोघांनी मागे वळून पाहिले, तर मेहर त्यांच्यासोबत नसून घरी होती.

किम कार्दशियन (Kim Kardashian)
नुकताच किम कार्दशियनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती पॅरिसच्या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, किम हॉटेलमधून बाहेर पडते आणि कारमध्ये बसते. मग तिला आठवते की, तिची मुलगी तिच्यासोबत नाही. मग ती पटकन हॉटेलमध्ये जाते आणि तिच्या मुलीला घेऊन येते.

जेनिफर गार्नर (Jennifer Garner)
जेनिफर गार्नर तीन मुलांची आई आहे. जेनिफरने सांगितले होते की, कधीकधी कुठे जाताना ती तिच्या तिसऱ्या मुलाला विसरते.

हॅले बॅरी (Halle Barry)
अमेरिकन अभिनेत्री हॅले बॅरीने सांगितले होते की, तिला वाटत होते की, ती आपली मुलगी कायमची गमावेल. हेलीने सांगितले की, ती तिच्या मुलीसोबत खरेदीसाठी गेली होती आणि जेव्हा ती खरेदी करण्यात व्यस्त होती. तेव्हा तिची ९ वर्षांची मुलगी अचानक शॉपिंग मॉलमध्ये गायब झाली, त्यांनतर ती थोड्या वेळाने सापडली.

हेही वाचा-

हे देखील वाचा