Sunday, May 19, 2024

जगात भारी गिफ्ट! नोरा फतेहीला चाहत्यांकडून मिळाली ‘ही’ भेट, पाहून अभिनेत्रीलाही कोसळलं रडू

बॉलिवूडमध्ये आपल्याला अनेक कलाकार पाहायला मिळतात. त्यातील काही कलाकारांचे आई-वडील आधीपासूनच इंडस्ट्रीत सक्रिय असल्याने आलेले असतात, तर काहींनी स्वत:च्या हिमतीवर इथपर्यंतचा प्रवास केलेला असतो. कोणत्याही पाठिंब्याशिवाय यश मिळवलेल्या कलाकारांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचाही समावेश होतो. नोराला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. आज ती घराघरात ओळखली जाते. तिच्या चाहत्यांमध्ये ती कमालीची प्रसिद्ध आहे. अशातच सोमवारी (०६ फेब्रुवारी) तिने वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशी तिला असे काही गिफ्ट मिळाले, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

आपल्या डान्स मूव्हजने कोट्यवधी चाहत्यांना दीवाना बनवणारी अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) वाढदिवशी एकही फोटो शेअर केला नव्हता. मात्र, वाढदिवसाच्या एक दिवसानंतर लगेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिला चाहत्यांकडून गिफ्ट मिळालेला आहे.

खरं तर नोराच्या अनेक फॅन क्लब्सने एक ग्रूप बनवून तिचा वाढदिवस खास बनवण्यासाठी एका फाऊंडेशनशी हातमिळवणी केली. तसेच ३०० हून अधिक मुलांना नोराच्या नावाने जेवणही दिले. याचा एक व्हिडिओ तयार करून तो नोराला पाठवण्यात आला. या व्हिडिओची खासियत म्हणजे, व्हिडिओत सर्व मुले नोराला एक-एक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

व्हिडिओ शेअर करत नोराने तिला झालेला आनंद शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी आता खरोखर रडत आहे. हे आतापर्यंतचं सर्वात भारी भेट आहे. माझ्या सर्व फॅन क्लब्सला धन्यवाद, जे एकत्र आले आणि माझ्या नावाने इतक्या साऱ्या वंचित मुलांना जेवण दिले. माझे चाहते खूप सामान्य, विचारी आणि दयाळू लोक आहेत. या अद्भुत अनमोल भेटवस्तूबद्दल खूप खूप धन्यवाद, देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.”

नोराने सन २०१४ मध्ये आलेल्या ‘रोर: टायगर ऑफ द सुंदरबन’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर ती अनेक तेलुगू सिनेमात आणि टीव्ही शोमध्ये दिसली होती. मात्र, तिला ‘बाहुबली’ सिनेमातील ‘मनोहरी’ या गाण्यातून मिळाली होती. यानंतर नोराचा डंका भारतीय सिनेसृष्टीत वाजू लागला.

नोरा तिच्या आयटम साँगसाठीही ओळखली जाते. तिचे ‘दिलबर दिलबर’, ‘एक तो कम जिंदगानी’ यांसारखी गाणी विशेष गाजली आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा