छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त असलेल्या ‘बिग बॉस‘ या शोचे 16वे पर्व आता संपले आहे. या पर्वाला एमसी स्टॅन याच्या रूपात विजेता मिळाला आहे. मात्र, याच शोमधील स्पर्धक राहिलेली प्रियांका चाहर चौधरी हिचा 3 वर्षे जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती खूपच वेगळ्या अंदाजात दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) शोनंतर नेटकऱ्यांची प्रियांका चौधरी (Priyanka Choudhary) हिच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. नेटकऱ्यांना यावेळी जुने व्हिडिओ आणि काही पोस्ट पाहायला मिळाल्या. सन 2020मध्ये प्रियांकाने बेडवरून उठून गरम कॉफी पितानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत प्रियांका पांढऱ्या रंगाच्या बेडशीटमध्ये खूपच हॉट दिसत आहे. प्रियांका गरम कॉफीसोबत नयनरम्य दृश्याचा आनंद लुटण्यासाठी खिडकीजवळ जाऊन थांबते. प्रियांकाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या सकाळच्या कॉफीसोबत मला आवडणाऱ्या गोष्टी!! सुखदायक संगीत आणि सुंदर दृश्य.”
View this post on Instagram
या व्हिडिओवर 50 हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. तसेच, अनेकांनी कमेंट्सही करत प्रश्न विचारले आहेत. एकाने असेही म्हटले की, “मी तुझ्यासाठी कपडे पाठवू का?” दुसऱ्या एकाने असे लिहिले की, “कपडे घालून झोपत नाही का?” आणखी एकाने कमेंट केली की, “यामध्ये बोल्डनेस कुठंय? इथे दीपिकाच्या बेशरम रंगमधील कपड्यांपेक्षा सर्व काही झाकलेले आहे.” याव्यतिरिक्त अनेकांनी तिच्या व्हिडिओवर फायर आणि लव्ह इमोजी शेअर केले आहेत.
बिग बॉस शोदरम्यान असे वृत्त आले होते की, तिला शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनित ‘डंकी’ सिनेमाची ऑफर आली आहे. यासोबत सलमान खानच्या प्रोडक्शन एसकेएफ बॅनरखालील एका सिनेमासाठीही विचारणा झाली आहे. मात्र, यावर नुकत्याच एका मुलाखतीत प्रियांकाने प्रतिक्रिया दिली.
शोनंतर सलमान आणि शाहरुखच्या सिनेमात काम करणार प्रियांका?
माध्यमांशी बोलताना प्रियांका म्हणाली की, “मला शाहरुख खान सरांच्या सिनेमाबाबत कोणतीही माहिती नाहीये. कारण, मी आताच बाहेर आले आहे आणि मला कुणासोबतच बोलण्याची संधी मिळाली नाहीये. सलमान सरांनी मला नंतर त्यांची भेट घेण्यास सांगितले होते, पण यापेक्षा जास्त काहीच नाही. माझ्यासाठी शाहरुख आणि सलमान दोघेही परमेश्वरासारखे आहेत. मला ऑफर्सबद्दल कोणतीही माहिती नाहीये.”
बिग बॉसची दुसरी उपविजेती
प्रियांकाने ‘बिग बॉस 16’ पर्व जिंकले नाही, पण तिने शोमध्ये सर्वांनाच प्रभावित केले होते. सलमान खान याच्याकडून होस्ट करण्यात आलेल्या शोचा विजेता एमसी स्टॅन आणि उपविजेता शिव ठाकरे राहिला, तर प्रियांका दुसरी उपविजेती ठरली. (actress priyanka chaudhary was seen only in bedsheet 3 years old video is viral see here)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आलियाने शेअर केला गोंडस बाळाचा फोटो, गोंधळलेल्या नेटकऱ्यांना पडले 1500 प्रश्न; एक नजर टाकाच
‘स्ट्रगलिंग अभिनेत्यासारखे का वागताय?’, म्हणणाऱ्या युजरला धरम पाजींचे दमदार उत्तर; तुम्हीही कराल कौतुक