Tuesday, July 23, 2024

हे यशस्वी लग्न! प्रियांकाने पुन्हा परिधान केले पती निक जोनासचे आऊटफिट

वर्धा खानने बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती गायक निक जोनास यांची भेट घेतली. बॉलिवूड चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला यांची पत्नी आणि मुलगा लॉस एंजेलिसला गेले होते. यादरम्यान तिला प्रियांका-निकला भेटण्याची संधी मिळाली. वर्धाने या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आनंद व्यक्त केला, तर अनेकांनीही त्यांचे कौतुक केले पण काही चाहत्यांच्या नजरा प्रियांकाच्या ड्रेसवर खिळल्या. मग काय, युजर्स मजेशीर कमेंट करून आपल्या प्रितक्रिया देऊ लागले.

गुरुवारी (दि. 17 ऑक्टाेबर)ला वर्धा खान (wardha khan) हिने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले. या दोन्ही फाेटाेंमध्ये वर्धाने तिची दोन्ही मुले, प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनास (nick jonas) सोबत पोज देत फोटो शेअर केला. निकने काळ्या रंगाचा हुडी स्वेटशर्ट आणि शॉर्ट्स घातलेला दिसत आहे, तर प्रियंका काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. ही फाेटाे शेअर करताना वर्धाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आमच्या प्रियांका आणि तिच्या सुंदर कुटुंबासह LA लिंकअप.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi ???? (@jerryxmimi)

या पोस्टवर दर्शन कुमार, जुही बब्बरसह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी प्रेम व्यक्त केले आहे. पण प्रियांकाच्या एका फॅन पेजने प्रियांकाच्या ड्रेसबद्दल खुलासा केला आहे. चाहत्याने प्रियांका आणि निक जोनासच्या फोटोचा कोलाज बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. इतकेच नाही तर प्रियांकाने जेव्हा-जेव्हा निकचा ड्रेस परिधान केला आहे, तेव्हा तिने त्याचे फोटोही शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi ???? (@jerryxmimi)

हे पाहून चाहते अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “अचूक लग्न = नवऱ्याचे कपडे घालणे/चोरी करणे आणि त्याच्यासोबत फोटो काढणे” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘एक कुटुंब जे एकत्र राहते, प्रार्थना करते आणि कपडेही शेअर करते’.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चाहते त्यांच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नाही तर दिग्दर्शक, रितेश देशमुखचा नवीन चित्रपट वेड लवकरच…

गुलाबी रंगात रंगली माधुरी दीक्षित, पाहा फोटो

हे देखील वाचा