अभिनेत्री प्रियांका चोप्रा जेव्हा जेव्हा भारतात येते तेव्हा ती नेहमीच चर्चेत असते. सातासमुद्रापार राहूनही प्रियांका आपल्या कुटुंबाशी आणि मुळांशी जोडलेली आहे. नुकतीच ती तिचा भाऊ सिद्धार्थच्या एंगेजमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी इथे आली होती. कौटुंबिक कामासोबतच प्रियांका तिचे व्यावसायिक कामही पाहते.
प्रियांकाने तिच्या आगामी ‘पानी’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. प्रियंका आता तिच्या भावाची एंगेजमेंट आणि ‘पानी’ या दोन्ही कार्यक्रमात सहभागी होऊन अमेरिकेत परतली आहे, पण अजूनही ती या ठिकाणच्या आठवणींमध्ये हरवलेली आहे. आज तीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो ‘पानी’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमातील आहेत. यासोबतच तिने कॅप्शन लिहिले आहे की, ‘यावेळी या प्रवासात माझी शेवटची रात्र मुंबईत आणि काही खास लोकांच्या सहवासात घालवली’. याशिवाय तीने चाहत्यांना ‘पानी’च्या रिलीज डेट बाबत सांगितले. प्रियांकाने लिहिले की, ‘आमची मराठी फीचर फिल्म ‘पानी’ १८ ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा निळ्या रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सोस्घाल मिडिया युजर्स तीच्या या फोटोंवर कमेंट करत आहेत आणि प्रश्नही विचारत आहेत की ती कुटुंबापासून ते करिअरपर्यंत सर्व गोष्टी इतक्या उर्जेने कशी सांभाळते? एका यूजरने हे रहस्य विचारले आणि कमेंट केली की, ‘मला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही हे सर्व कसे व्यवस्थापित करता? तुम्ही बऱ्याच भूमिकांचा समतोल साधता आणि प्रत्येक भूमिका उत्कृष्टपणे करता. तुम्ही सातासमुद्रापलीकडे असलात तरी तुमच्यात काही फरक पडत नाही, पण इथल्या गोष्टीही अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्या जातात. मला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कोणता मास्टरक्लास केला आहे आणि त्याचे रहस्य काय आहेत?
‘पानी’ हा प्रियंका चोप्राच्या प्रोडक्शनचा चौथा चित्रपट आहे. याआधी तिने ‘काय रे रास्कल’, ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘फायर ब्रँड’ असे मराठी चित्रपट केले आहेत. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित हा चित्रपट महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका माणसाच्या कथेवर आधारित आहे. प्रियांका चोप्राबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच प्रियांका चोप्राने ‘ब्लफ’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले.
प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राने नीलम उपाध्यायसोबत लग्न केले आहे. नीलम फिल्मी दुनियेतही सक्रिय आहे. ती दक्षिणेत अधिक सक्रिय आहे. नीलमला पहिला ब्रेक MTV मधून मिळाला होता. नीलमने २०१२ मध्ये ‘मिस्टर 7’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, हा चित्रपट फारसा चालला नाही परंतु समीक्षकांनी नीलमचे कौतुक केले. नीलम तेलगू चित्रपट ‘Action 3D’ मध्ये देखील दिसली आहे, याशिवाय तिने तमिळ इंडस्ट्रीतही अनेक चित्रपट केले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
बिग बॉस वर भडकल्या धनंजयच्या पत्नी आणि आई. शोवर लावले गंभीर आरोप…