Friday, September 11, 2026
Home बॉलीवूड राखी सावंत करत होती बाळाचे प्लॅनिंग; रितेशपासून घटस्फोटावर म्हणाली, ‘मी त्याचे पाय धरून…’

राखी सावंत करत होती बाळाचे प्लॅनिंग; रितेशपासून घटस्फोटावर म्हणाली, ‘मी त्याचे पाय धरून…’

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या लेटेस्ट पोस्टमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. राखी पती रितेशपासून वेगळी झाली आहे. तिच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. राखीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून रितेश सिंगसोबत घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटाचे अधिकृत विधान जारी केल्यानंतर राखीने एका मुलाखतीत सांगितले की, ती २०२२ मध्ये बाळाच्या जन्माची योजना आखत होती. पण अचानक रितेशने नाते तोडण्याचा निर्णय घेतला. राखीने मुलाखतीत सांगितले की, तिने रितेशचे पायही पकडले होते.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राखीने  तिच्या आणि रितेश सिंगच्या (Ritesh Singh) घटस्फोटाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. अभिनेत्री म्हणाली की, “रितेश रविवारी सकाळी अचानक बॅग पॅक करू लागला, त्याने जाण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या पत्नीसोबतच्या त्याच्या कायदेशीर अडचणी खूप वाढल्या होत्या.” राखी म्हणाली की, हा त्याचा निर्णय होता. तो शुक्रवारपासून तिच्यासोबत होता, रविवारी सकाळी उठला आणि त्याने अचानक बॅग भरायला सुरुवात केली.

राखी मुलाखतीत म्हणाली की, तिने रितेशला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला आणि सांगितले की, तिचे त्याच्यावर खरे प्रेम आहे. अभिनेत्री म्हणाली की, ती यावर्षी बाळासाठी प्लॅनिंग करत होती. ती रितेशची वर्षभर वाट पाहणार आहे. रितेश गेल्यानंतर तिने अनेक कॉल केले, पण त्याने उचलला नाही. राखी म्हणाली की, “त्याच्या आईनेही रितेशला समजवण्याचा प्रयत्न केला, तर त्याची आईही खूप रडली.”

राखी पती रितेशपासून वेगळी झाली आहे. त्यांचे तीन वर्षांचे लग्न मोडले आहे. अलीकडेच राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक निवेदन जारी करून तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली. आता राखी पती रितेशबद्दल उघडपणे बोलली आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा