Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड माझे मित्र माझ्या वडिलांसोबत दारू प्यायचे; रियाने सांगितल्या कठीण काळातल्या आठवणी…

माझे मित्र माझ्या वडिलांसोबत दारू प्यायचे; रियाने सांगितल्या कठीण काळातल्या आठवणी…

रिया चक्रवर्ती ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती तिच्या चित्रपटांपेक्षा इतर कारणांमुळे जास्त चर्चेत असते. तीच्या आयुष्यात एक कठीण काळ होता, जेव्हा तीला एनसीबीने अटक केली होती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, रियाने तिच्या आयुष्यातल्या या कठीण काळाबद्दल सांगितले. या काळात तिच्या कुटुंबाला कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला याबद्दलही ती बोलली आहे. रिया म्हणाली की जेव्हा ती तुरुंगात होती, तेव्हा तिचे मित्र तिच्या वडिलांसोबत दररोज दारू प्यायचे, जेणेकरून तिच्या वडिलांना एक सहारा मिळेल. 

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने या विषयांवर चर्चा केली. यावेळी ती म्हणाली की, तुरुंगात गेल्यानंतर माझ्या खऱ्या मित्रांची जाणीव झाली. रियाच्या मित्रांनी कठीण काळात तिच्या पालकांची काळजी घेण्यात अतुलनीय भूमिका बजावली होती. रिया म्हणाली, “जेव्हा मी तुरुंगात होते तेव्हा माझे एक किंवा दोन मित्र माझ्या वडिलांसोबत दारू प्यायचे आणि त्यांच्यासोबत जेवायचे.

अभिनेत्री पुढे म्हणाली की, जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मी म्हणाले, “तुमचं एवढं वजन का वाढलं आहे? मी तिथे तुरुंगात होते आणि तुम्ही इथे जेवत आहात, वजन वाढवत आहात.” अभिनेत्री पुढे म्हणाली की तिच्या मैत्रिणींनी नंतर उघड केले की ते तिच्या पालकांना खायला घालण्याचा आणि परिस्थितीबद्दल त्यांना थोडे नॉर्मल वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. रियाने सांगितले की, तिला या गोष्टीचा खूप फटका बसला आणि त्याचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला. तीने तिच्या मित्रांची त्यांच्या दृढ समर्थनाबद्दल आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत केल्याबद्दल त्याच्या कुटुंबाची कृतज्ञता व्यक्त केली.

तिच्या मैत्रिणींचा संदर्भ देत, रियाने त्यांना तिची सुपरपॉवर म्हणून वर्णन केले आहे. रिया म्हणाली, तिचे मित्र जसे तिच्या कुटुंबासोबत होते, तिला आणखी कशाचीही गरज नाही. अभिनेत्री म्हणाली, “तुम्हाला इतर कशाचीही गरज नाही, आयुष्यात तुमचा एक सच्चा मित्र असावा आणि ते पुरेसे आहे. शिबानी माझ्यासाठी तशीच होती, शिबानी ज्या प्रकारे माझ्यासाठी उभी राहिली ते माझ्यासाठी खूप आहे. 

रिया चक्रवर्तीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची २०२१ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘चेहरे’ चित्रपटात दिसली होती. सध्या ती चित्रपटांपेक्षा उद्योजक म्हणून जास्त सक्रिय आहे. अलीकडेच तीने कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला आहे. याशिवाय ती यूट्यूबवर ‘चॅप्टर 2’ नावाचा पॉडकास्ट शो देखील होस्ट करते, ज्यामध्ये आतापर्यंत आमिर खान आणि सुष्मिता सेन सारखे कलाकार दिसले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

दीपिका-रणवीर या दिवशी करणार पहिल्या बाळाचे स्वागत, मोठी बातमी आली समोर

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा