Thursday, November 30, 2023

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने स्वीकारला इस्लाम; म्हणाली, ‘पूर्ण कपडे घातले तरीही दिसणार ग्लॅमरस’

जगभरात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी धर्म बदलला आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. कुणी लग्नासाठी, तर कुणी इतर कारणांसाठी धर्मपरिवर्तन केले आहे. धर्म बदलणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. ती म्हणजेच घाणाची प्रसिद्ध अभिनेत्री रोसमंड ऍलेड ब्राऊन हिचे. रोसमंड हिने ईसाई धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो आहेत. मात्र, सोशल मीडियावर अकुआपेम पोलू नावाने प्रसिद्ध असलेल्या रोसमंड हिला आता लोक इस्लाम धर्मानुसार कपडे परिधान करण्याची अपेक्षा करत आहेत.

यावर स्वत: अभिनेत्री रोसमंड ऍलेड ब्राऊन (Rosemond Alade Brown) हिने सांगितले आहे की, आता ती छोटे आणि रिव्हिलिंग कपडे परिधान करणार नाहीये. यासोबतच तिने असेही म्हटले आहे की, ती शरीर झाकणारे कपडे परिधान केल्यानंतरही ग्लॅमरस दिसेल.

माध्यमांतील वृत्तांनुसार, रोसमंड हिने ९ ऑगस्ट रोजी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. याची पुष्टी तिने स्वत: तिच्या इंस्टाग्राम पेजवरून केली होती. या फोटोंमध्ये तिने मोठा गाऊन आणि हिजाब घातल्याचे दिसते. अकुआपेम हिचा असा विश्वास आहे की, तिने जरी कपड्यांनी तिचे पूर्ण शरीर झाकले, तरीही ती खूप ग्लॅमरस दिसेल. लोकांना याचा त्रास होऊ शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosemond Alade Brown (@akuapem_poloo)

अकुआपेम हिने बुधवारी (दि. २४ ऑगस्ट) तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने इस्लाम धर्म स्वीकारण्याचे कारणही सांगितले. ती म्हणाली की, तिने तिच्या ९ वर्षांच्या मुलामुळे इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. तिने या व्हिडिओत तिच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या चिंतेबद्दलही उत्तर दिले आहे. त्यांना वाटते की, कुणीतरी तिची दिशाभूल केली आहे, ज्यामुळे तिने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosemond Alade Brown (@akuapem_poloo)

अभिनेत्री रोसमंड हिने सांगितल्यानुसार, तिचा नवीन धर्म इस्लाम आणि जुना धर्म ईसाई धर्म यामध्ये फारसे अंतर नाहीये. युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओत ती म्हणते की, तिने नेहमीच मुस्लीमांवर आणि इस्लाम धर्मावर प्रेम केले आहे. या प्रेमापोटीच तिने हा धर्म स्वीकारला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosemond Alade Brown (@akuapem_poloo)

व्हिडिओत ती पुढे म्हणते की, “मी इस्लाम धर्म स्वीकारल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटत आहे. माझा मुलगा ९ वर्षांचा आहे आणि तो मुस्लीम आहे. मी मुस्लीम व्यक्तीशी लग्न केले आहे. मला माहितीये की, मी काय करत आहे. मी अनेक वर्षांपासून इस्लाम धर्माला ओळखते. माझे अनेक मित्र मुस्लीम आहेत. त्यामुळे मला मुस्लीमांशी आणि इस्लाम धर्मावर प्रेम आहे.”

रोसमंड तिने स्वीकारलेल्या इस्लाम धर्मामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
चाहत्यांसाठी खुशखबर! कार्तिक आर्यन आणि रश्मिकाची जोडी करणार एकत्र काम
फरहान शिबानी होणार आई बाबा? व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा
‘वडापाव कोणेकाळी आधार होता’, अमोल कोल्हेंना आठवला संघर्षाचा काळ

हे देखील वाचा