भारीच ना! समंथाने बॉलिवूडच्या ‘या’ हँडसम हंकशी मिळवला हात, ओटीटीवर घालणार धुमाकूळ


दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने आणखी एक मोठा हिंदी प्रोजेक्ट सुरू केला आहे. अल्लू अर्जुन अभिनित पॅन इंडिया चित्रपट ‘पुष्पा’मधील तिच्या हॉट डान्सने प्रेक्षकांना पुन्हा एकदा वेड लावणारी ‘फॅमिली मॅन २’ स्टार लवकरच दुसर्‍या हिंदी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सामंथाने ‘द फॅमिली मॅन २’चे दिग्दर्शक राज आणि डीके (Raj & DK) यांच्याशी हातमिळवणी केली आहे. हे ब्लॉकबस्टर जोडी आणखी एक सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज घेऊन येणार आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ही वेबसीरिज सुपरहिट अमेरिकन स्पाय सीरिज सिटाडेलची भारतीय व्हर्जन असणार आहे. ज्यामध्ये समंथा (Samantha Ruth Prabhu) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टसाठी एका हँडसम बॉलिवूड स्टारला साईन करण्यात आले आहे. तो म्हणजे वरुण धवन (Varun Dhawan) होय. तो या वेब सीरिजमध्ये समंथासोबत दिसणार आहे.

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अमेरिकन स्पाय ड्रामा वेब सीरिज ‘सिटाडेल’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. मात्र, भारतातील या सीरिजमध्ये आता समंथा दिसणार आहे. ही वेबसीरिज ऍमेझॉन प्राईमवर दाखवली जाईल, ज्यासाठी अभिनेता वरुणने खूप आधी करार केला होता. वरुण आणि समंथा हे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ही वेबसीरिज २०२२ मध्ये सुरू होणार आहे. ज्याची प्रदर्शनाची तयारी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, वेब सीरिजसाठी दोन्ही स्टार्सना खूप ट्रेनिंग आणि वर्कशॉप्स घ्यावे लागतील. या ऍक्शनवर आधारित वेब सीरिजमध्ये अभिनेत्री समंथा देखील स्मोकी ऍक्शन करताना दिसणार आहे. आता या वेब सीरिजसाठी चाहत्यांची उत्सुकता वाढतच चालली आहे.

२ ऑक्टोबर रोजी घटस्फोटाची केली घोषणा
समंथाने २ ऑक्टोबर रोजी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मोठे वक्तव्य केले होते. त्यात तिने लिहिले होते की, “बऱ्याच विचारविनिमयानंतर मी आणि नागाने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे खूप भाग्यवान आहोत की, मैत्री हा एक दशकाहून अधिक काळ आमच्या नात्याचा मुख्य भाग होता, आम्हाला खात्री आहे की, आमच्यामध्ये एक खास बंधन राहील.”

समंथा आणि चैतन्यने २०१७ मध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. अलीकडेच, दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून ४ वर्षांचे नाते तोडल्याची बातमी शेअर केली होती. दोघांच्या या निर्णयामुळे चाहते निराश झाले होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!