जगातील सर्वात उंच मोबाईल थिएटरमध्ये रिलीझ झाला रणवीरचा ‘८३’ सिनेमा, हिमालयाच्या शिखरावर बनवलंय चित्रपटगृह


अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपट शुक्रवारी (२४ डिसेंबर) प्रदर्शित झाला. मात्र, क्रिकेट तसेच इतर खेळांवर बनलेल्या चित्रपटांच्या सर्व निर्मात्यांचे लक्ष हे रणवीरच्या या चित्रपटाकडे लागले आहे. ‘८३’ चित्रपट भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकावरवर आधारित आहे. आता ‘८३’ या चित्रपटाबद्दल असे वृत्त आहे की, हा चित्रपट जगातील सर्वात उंच मोबाईल चित्रपटगृहामध्ये ११,५६२ फूट उंचावर लेह-लडाखमध्ये प्रदर्शित झाला आहे.

लडाखमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. तिथे तापमान शून्य डिग्री सेल्सिअसच्या खाली देखील जाते. त्यामुळे या मोबाईल चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक हीटिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. जेणेकरून प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात व आरामामध्ये पाहू शकतात. हा चित्रपट पाहण्यासाठी लडाख नाही, तर आजूबाजूच्या शहरातील प्रेक्षक देखील पाहायला येऊ शकतात. याव्यतिरिक्त अरुणाचल प्रदेश आणि हिसार या ठिकाणीदेखील मोबाईल चित्रपटगृहामध्ये ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

रणवीरच्या (Ranveer Singh) ‘८३’ चित्रपटाचे निर्माते कबीर खान (Kabir Khan) म्हणतात की, “८३ आज चित्रपट लडाखमध्ये ११,५६२ जगातील सर्वात उंच चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. हे शानदार आहे. मी प्रेक्षकांकडून हा चित्रपट कसा वाटला या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे. लडाखला हे केवळ माझ्या चित्रपटासाठी विशेष स्थान नाही, तर ते माझ्या हृदयाच्या जवळ आहे. कारण कॉलेजच्या दिवसांमध्ये मी इकडे ट्रेकिंग करण्यासाठी काही महिने राहिला आहे.”

पुढे चित्रपटाचे निर्माते शामिल शिबाशिष (Shamil Shibashish) म्हणतात की, “८३ हा चित्रपट आमच्या मेहनतीचे फळ आहे. मी खूप खुश आहे की, हा चित्रपट या चित्रपटगृहामध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट जगातील सर्वात उंच ठिकाणी देखील पोचला आहे. एक चांगला चित्रपट पाहण्याचा अनुभव देखील एक मोठं स्वप्न आहे. हे क्षण माझ्यासाठी खूप खास आहेत.”

आता या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘तख्त’, ‘जयेशभाई जोरदार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!