Thursday, August 7, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! शिल्पा शेट्टीला कार चालवायची वाटते भिती, अभिनेत्रीबद्दल ‘या’ खास गोष्टी जाणून व्हाल थक्क

काय सांगता! शिल्पा शेट्टीला कार चालवायची वाटते भिती, अभिनेत्रीबद्दल ‘या’ खास गोष्टी जाणून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या अभिनयाच्या आणि डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. फिटनेस ही शिल्पाची एक अनाेखी ओळख आहे. तब्बल २५ वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूडमध्ये घालवणाऱ्या शिल्पाने शाहरुख खान आणि काजोल यांच्यासोबत ‘बाजीगर’ या सिनेमातून पदार्पण केले. बाजीगरच्या यशानंतर तिनं यशाचे शिखर गाठताना कधी मागे वळून पाहिल नाही. चला तर मग जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गाेष्टी…

शिल्पानं केलं जाहिरातींमधून पदार्पण- शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)हिने दहावी उत्तीर्ण झाल्यावर लगेच मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. यानंतर ती पहिल्यांदा लिम्का (Limca) कोल्ड्रिंकच्या जाहिरातीत दिसली. या जाहिरातीद्वारे शिल्पा शेट्टीने मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता.

शिल्पाला वाटते कार चालवण्यापासून भीती- बॉलीवूडची लाेकप्रिय अभिनेत्री शिल्पा गाडी चालवायला खूप घाबरते. ती कधीही स्वतः कार चालवत नाही. या भीतीमुळे ती नेहमी सोबत ड्रायव्हर ठेवते.

शिल्पा शेट्टीला खाण्यापिण्याची आवड- शिल्पा शेट्टीलाही खाण्या पिण्याची खूप आवड आहे. शिल्पाला कॉर्न पुलाव, पाणीपुरी, उपमा, करी रोटी, चिकन बिर्याणी आणि दक्षिण भारतीय पदार्थ आवडतात. यासोबतच शिल्पाला स्वयंपाक करायलाही खूप आवडते.

तंदुरूस्त आणि निराेगी राहण्यासाठी करते हे उपाय- शिल्पा शेट्टीची उंची ५ फूट १० इंच आहे. चित्रपट जगतातील सर्वात उंच अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. शिल्पाला स्वतःला फिट ठेवायला आवडते. ती स्वत:ला तंदुरुस्त आणि निराेगी ठेवण्यासाठी नियमित व्यायामासोबत योगा करते. ती अनेकदा तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

शिल्पा शेट्टी इंस्टाग्रामवर असते सक्रिय- शिल्पा शेट्टी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे 26.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

पुन्हा एकदा शिल्पा वळली चित्रपटांकडे- शिल्पा पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे. पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी शिल्पाने स्वत:साठी अनेक प्रकारचे व्यवसायही उघडले आहेत. शिल्पा शेट्टीच्या नावावर अनेक रेस्टॉरंट आहेत. याशिवाय ती स्वतःचे यूट्यूब चॅनलही चालवते. शिल्पा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनही भरपूर कमाई करते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
दु:खद! आईच्या निधनाने पूर्ण तुटलाय महेश बाबू, बहीण मंजुलाची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

फक्त सैफ अली खानचं नाही, बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकारही आहेत राजघराण्याचे वारसदार

हे देखील वाचा