Thursday, March 28, 2024

आयुष्यातील मोठा निर्णय घेताना शिल्पा शेट्टी झालीय ‘कन्फ्यूज’, पोस्ट शेअर करत मागितला सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घटना घडत आहेत. शिल्पाचा पती राज कुंद्रावर अश्लील व्हिडिओ बनवून त्याला प्रसिद्ध करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याला अटक देखील करण्यात आली होती. मात्र आता त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. तो जवळजवळ ६२ दिवस पोलिस कोठडीत होता. तर बाहेर आल्यानंतर राज कुंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु शिल्पा शेट्टी सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यासोबत ती आपले विचार शेअर करत असते. तिचा पती जामीनवर सुटून घरी पोहोचल्यानंतर शिल्पाने एक पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीने एक किस्सा तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टीने शेअर केली ‘ही’ पोस्ट
नुकतीच शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ती या पोस्टच्या माध्यमातून आयुष्याच्या मोठ्या आणि महत्वाच्या निर्णयाबद्दल बोलत आहे. खरं तर, पूर्वीप्रमाणेच, तिने एका पुस्तकात छापलेल्या विचारांचा फोटो शेअर केले आहे. त्याचे शीर्षक असे आहे, ‘आत्मनिर्भर होणे.’ या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “कठीण प्रसंगांना सामोरे जाणे, चारित्र्यवान व्यक्ती स्वतःवर अवलंबून असते. तो व्यक्ती स्वतः पुढच्या पावला संबंधित निर्णय घेतो. आपल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घेतो आणि त्या निर्णयांना स्वतःचे मानतो.”

शिल्पा शेअर करतेय तिचे विचार
शिल्पा शेट्टीच्या या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “शेवटी, आपण निवडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपणच जबाबदार आहोत. जर आपण भाग्यवान असेल तर आपल्याला मित्र आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळतो. त्याचबरोबर आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आणि त्याची जबाबदारीही घ्यावी लागेल. बरोबर की अयोग्य, ते आपल्यावर अवलंबून आहे. एक दीर्घ श्वास घेऊन, जो मिळालेला सल्ला आहे त्याच्याकडे लक्ष देतो. आपल्या अनुभवावर विचार करुन त्यानंतर जे सर्वोत्तम कार्य आहे ते करतो. जर गोष्टी सुरळीत चालल्या, तर सुटकेचा श्वास घेतो आणि जर काही ठीक होत नसेल तर त्याची जबाबदारी घेऊन पुढे गेले पाहिजे.”

चाहत्यांसोबत शेअर केले ‘कन्फ्युजन’
शिल्पा शेट्टी पुढे तिच्या पोस्टमध्ये म्हणाली की, “माझ्याकडे अनेक मते आली आणि समर्थन मिळाले. मात्र मला समजले की, शेवटी मी आयुष्यात कोणता निर्णय घेते, हे माझ्यावर अवलंबून आहे.” यासोबतच शिल्पाने ‘हे किंवा ते’ असे स्टीकर लावले आहे. आता अशा परिस्थितीत, चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की शिल्पा कोणत्या निर्णयाबद्दल गोंधळात पडली आहे. खरं तर शिल्पाने या अगोदर अशा अनेक पोस्ट केल्या आहे. पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून याची सुरू झाली. जे पाहून चाहते पुन्हा पुन्हा गोंधळून जात आहेत.

शिल्पाच्या पोस्टने चाहत्यांना पाडले गोंधळात
पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा शेट्टी सतत सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करत होती. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी सर्व प्रकारच्या गोष्टींचा अंदाज लावत होते. बऱ्याच लोकांनी तर राज आणि शिल्पा यांच्यातील दुरावा आला असल्याचे म्हटले. इतकेच नव्हे तर, अनेक माध्यमांच्या अहवालांमध्येही दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले होते. आता या दरम्यान, तिची ही पोस्ट समोर आली आहे, त्यातून हे स्पष्ट होते की दोघांमध्ये सर्वकाही ठीक आहे आणि ती राज जामिनावर सुटून आल्याबद्दल खूप खूश आहे. याच्या व्यतिरिक्त शिल्पा सध्या ‘सुपर डान्सर ४’ या मध्ये परीक्षक म्हणून पुन्हा दिसू लागली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा