अरे व्वा! स्वरा भास्कर लवकरच होणार आई; म्हणाली, ‘मी आता प्रतीक्षा करू शकत नाही’


चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी स्वरा भास्कर खऱ्या आयुष्यातही तिच्या बोल्ड वक्तव्यासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. स्वरा नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. अलीकडेच, दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री अनाथ मुलांसोबत सेलिब्रेशन करताना दिसली आणि आता ती एक मूल दत्तक घेण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आहे. ही बातमी मिळाल्यापासून चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

सध्या स्वरा कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नसून सिंगल लाईफ एन्जॉय करत आहे. अशा परिस्थितीत तिने लवकरच एक मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कायदेशीर प्रक्रिया लांबलचक असते, त्यामुळे स्वराही तिच्या कायदेशीर प्रक्रियेत पुढे सरकली आहे.

एका मुलाखतीत बोलताना स्वरा म्हणाली की, तिला नेहमीच कुटुंब आणि मूल हवे होते. ती म्हणाली होती की, “मला वाटते की, मूल दत्तक घेणे हा एकमेव मार्ग आहे, ज्याद्वारे मी माझे स्वप्न पूर्ण करू शकते.”

“दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी अशा अनेक जोडप्यांना भेटले, ज्यांनी मूल दत्तक घेतले आहे. मी त्यांच्याशी बोलले आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. संपूर्ण प्रक्रिया आणि त्याचे परिणाम देखील काळजीपूर्वक लक्ष दिले गेले,” असेही ती म्हणाली आहे.

स्वराने सांगितले की, या निर्णयावर तिचे कुटुंबीयही तिच्यासोबत आहेत आणि तिला पाठिंबा देत आहेत. तिने मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज केला आहे. ती म्हणाला की, “मला माहित आहे की, दीर्घ प्रक्रियेमुळे मला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, परंतु आता मी पालक होण्यासाठी अधिक प्रतीक्षा करू शकत नाही.”

स्वराच्‍या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आगामी ‘शीर-कोरमा’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये स्वरा एका लेस्बियनची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत असून, शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. २४ नोव्हेंबर रोजी, चित्रपटाचे दिग्दर्शक, फराज यांनी घोषणा केली की, स्वराला लंडन इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिजीत बिचुकलेला कोरोनाची लागण, ‘बिग बॉस १५’ मध्ये न घेण्याचा निर्मात्यांचा निर्णय

-वाघीण आली परत, सुष्मिता सेनच्या बहुप्रतीक्षित ‘आर्या २’ वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

-ग्लोबल ट्रेंडिंग कपल असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची संपत्ती ऐकून तुमचेही डोळे होती पांढरे


Latest Post

error: Content is protected !!