Friday, July 12, 2024

अरर! एक्स बाॅयफ्रेंडनं थोबाडीत काय मारली अभिनेत्रीनं डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्याच केली

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला चांगलाच धक्का बसला आहे. हसमुख मुलीने इतका भयंकर निर्णय का घेतला हे त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहते अजूनही समजू शकलेले नाहीत? तिच्या सुसाईड नोटचा आधार घेत पोलिसांनी आरोपी, शेजारी आणि एक्स बाॅयफ्रेंड राहुललाही अटक केली आहे. मात्र, आता या प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, वैशाली ठक्कर (vaishali takkar) हिच्या चुलत बहिणीने असे काही सांगितले की, कदाचित त्याचा अदांज अभिनेत्रीच्या घरच्यांनाही आला नसेल. अभिनेत्रीच्या चुलत बहिणीचा दावा आहे की, वैशाली तिच्या सर्व वैयक्तिक गोष्टी त्याच्यासोबत शेअर करत असे. चुलत बहिणीने सांगितले की, “अभिनेत्री तिचा एक्स बाॅयफ्रेंड राहुलच्या वागण्याने खूप नाराज झाली होती.” राहुलने वैशालीला थाेबाडात मारल्याचे अभिनेत्रीच्या कुटुंबियांना सांगण्यात आले.

vaishali takkar

राहुलच्या मारामुळे वैशाली इतकी दुखावली गेली की, ती डिप्रेशनमध्ये गेली. या घटनेनंतर राहुलच्या सततच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. वैशालीच्या बहिणीने आणखी  धक्कादायक खुलासे कुटुंब आणि पोलिसांन समाेर केले.

तिने सांगितले की, “राहुलने वैशालीला वचन दिले होते की, तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन वैशालीशी लग्न करेल. हे सर्व सांगून तो वैशालीचा फायदा घेत राहिला. जेव्हा अभिनेत्रीच्या लक्षात आले की, राहुलला आपल्या पत्नीला घटस्फोट देणार नाही आणि तो फक्त तिची फसवणूक करत आहे. तेव्हा वैशाली राहुलकडे दुर्लक्ष करू लागली, ज्याचे राहुलला खूप वाईट वाटले. स्वतःला वैशालीपासून दूर गेल्याचे पाहून राहुल स्तब्ध झाला आणि त्याने अभिनेत्रीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुलने वैशालीला धमक्या देण्यास सुरुवात केली. तो तिला सतत त्रास देत असे आणि जेव्हा जेव्हा वैशालीच्या लग्नाचे प्रकरण निघायचे तेव्हा तो लग्न ताेडुन टाकत असे.”

वैशाली ठक्कर प्रसिद्ध शो ‘ससुराल सिमर का’ मध्ये दिसली आहे. या शोमधून तिला बरीच ओळखही मिळाली. या शोनंतर ती ‘ये वादा रहा’, ‘ये है आशिकी’, ‘सुपर सिस्टर’, ‘लाल इश्क’ मध्ये दिसली हाेती. वैशाली शेवटची 2019च्या ‘मनमोहिनी’ शोमध्ये देखील दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
सोज्वळ राशीचा भन्नाट अंदाज! फोटो गॅलेरी फक्त तुमच्यासाठी

कॅटरिनाने खोलली विकी कौशलची पोल, म्हणाली तो खूपच सिंपल स्वभावाचा…

हे देखील वाचा