Saturday, December 7, 2024
Home कॅलेंडर इंग्लिश विंग्लिशमध्ये श्रीदेवीच्या पतीची भूमिका केलेल्या ‘त्या’ कलाकाराची कहानी आहे मनोरंजक

इंग्लिश विंग्लिशमध्ये श्रीदेवीच्या पतीची भूमिका केलेल्या ‘त्या’ कलाकाराची कहानी आहे मनोरंजक

बॉलीवूडमधील एक दिग्गज अभिनेता आदिल हुसेनचा जन्म ५ ऑक्टोबर १९६२ रोजी झाला. ते लवकरच आपला ५८वा वाढदिवस साजरा करणार आहे. अनेक कारणांनी त्यांचा हा वाढदिवस खास राहणार आहे. याला कारण म्हणजे या वाढदिवसापुर्वी त्यांना मिळालेला इंडो जर्मन फिल्म वीकचा सर्वश्रेष्ठ कलाकाराचा पुरस्कार होय.

आदिल हुसेन यांनी बॉलीवुडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. पारंपारिक अभिनयाला छेद त्यांनी प्रत्येक अदाकारीतून आपली छाप सोडली आहे. त्यांच्या याच ५८व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याशी जोडलेल्या काही खास गोष्ट आज तुम्हाला दैनिक बोंबाबोंबचे प्रतिनीधी सांगणार आहेत. तर चला मग सुरु करुया आदिल हुसेन यांच्याशी संबंधित एबीसीडी…

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

आदिल हुसेन यांचा जन्म आसाम राज्यातील गोलपारा येथे झाला. त्यांचे वडील हे शिक्षक होते. वय वर्ष केवळ ७ असतानाच त्यांनी आपल्या शाळेत अभिनय करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कॉलेज जिवनातही कधी अभिनय सोडला नाही. ते शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असेपर्यंत सतत अभिनय करत राहिले.

अगदी टीपिकल कलाकाराप्रमाणे कॉलेज सोडल्यावर त्यांनी थेटर करायला सुरुवात केली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण केल्यावर त्यांनी ड्रामा स्टुडिओ लंडन येथेही शिक्षण घेतले.

हुसेन यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आसामी भाषेतून केली. यात त्यांनी बराच काळ या भाषेत अनेक चित्रपटांत काम केले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हा बॉलीवूडकडे वळवला. पहिल्यांदा ते जासूस विजय या टीव्ही सिरीजमध्ये दिसले. त्यांनतर पुढे कमिने या सिनेमात त्यांनी काम केले. २००९साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने चांगली कमाई केली होती. यात शाहिद कपूरने मुख्य भुमिका केली होती.

सर्व चांगलं घडत असलं तरी हुसेन यांना खरी ओळख मिळाली ती २०१० साली आलेल्या इश्किया सिनेमामुळे. या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे दर्शकांकडून मोठ्या प्रमाणात कौतूक झाले. त्यानंतर हुसेन यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. ते सतत दर्शकांच्या मनावर राज्य करु लागले. त्यानंतर त्यांनी इंग्रंजी, बंगाली, तामिळ सिनेमातही काम केले.

२०१२मध्ये गौरी शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या इंग्लिश विंग्लिश सिनेमात त्यांनी श्रीदेवीच्या पतीची भूमिका केली होती. या सिनेमात त्यांनी अतिशय सशक्त अभिनयाचे प्रदर्शन केले होते.कबीर सिंग, दिल्ली क्राईम, कमांडो २, फोर्स २, पाश्चर्ड, लुटेरा व लाईफ ऑफ पाय हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत.

त्यांना काही दिवसांपुर्वीच इंडो जर्नम फिल्म वीकचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या परिक्षा व निरवाना इन या सिनेमांसाठी मिळाला. परिक्षा सिनेमा एक बाप आपल्या मुलाला शिकविण्यासाठी काय काय करु शकतो या कथेवर आधारीत आहे. त्यात एका रिक्षा चालकाची भुमिका हुसेन यांनी केली आहे.

हेही वाचा-
विवाहित असूनही त्याने केले श्रीदेवीशी गुपचूप लग्न, ३३ फ्लॉप सिनेमे तरीही झाला बॉलिवूडचा सुपरस्टार
बॉलिवूडमधील या नायिकांनी पितापुत्रांसोबत केलाय  ऑनस्क्रिन रोमान्स जया प्रदा, श्रीदेवी यांचेही यादीत नाव
शाहरूखसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेल्या या ५ अभिनेत्रींनी घेतलाय जगाचा निरोप, एकीच्या मृत्यूचं आजंही कोडं

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा