मॉडेलने लावला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर ‘पॉर्न व्हिडिओच्या रॅकेट’मध्ये सामील असण्याचा आरोप

Adult Video Case Model Sagarika Shona Suman Accused Bollywood Actress Shilpa Shetty Husband Raj Kundra


बॉलिवूडमध्ये सध्या एक ऍडल्ट व्हिडिओ खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अभिनेत्री ‘गहना वशिष्ठ’ हिला अटक केले होते. तिच्यावर पॉर्न व्हिडिओ शूट करून तो वेबसाईटवर अपलोड करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात अजुन एक आरोपी ‘उमेश कामत’ याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच राज कुंद्राच्या कंपनीच्या एमडी देखील या सगळ्या प्रकारात सामील आहे, असा आरोप लावला आहे. राज कुंद्रा हा प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आहे. राज कुंद्राच्या टीमने देखील असे सांगितले आहे की, कुंद्रा या सगळ्यात सामील नाहीत. या व्हिडिओबाबत कंपनीचे एमडी यांना जबाबदार मानण्यात आले आहे.

हे सगळं चालू असतानाच दुसरीकडे ‘सागरिका सोना सुगम’ नावाच्या एका मॉडेलने राज कुंद्रावर धडधडीत आरोप केला आहे की, तो या सगळ्यात सामील आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी.

सागरिकाचं असं म्हणणं आहे की, राज कुंद्रा देखील यात अप्रत्यक्षपणे या सगळ्याचा भाग आहेत. तिने असे म्हटले आहे की, “जेवढ्या ही पाॅर्न साईटचे मालक आहेत आणि जेवढ्या काही अशा गोष्टी इंडस्ट्रीमध्ये घडत आहेत. त्या लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजेत. मागील काही दिवसांपासून गहना वशिष्ठ हिचं नाव या सगळ्या बाबतीत समोर येत आहे. पण राज कुंद्रा देखील या सगळ्यात तेवढेच सामील आहेत. मला फक्त एवढच वाटत की त्यांना लवकरात लवकर अटक केले जावे. कारण या सगळ्यामुळे खूप लोकांचं आयुष्य खराब होत आहे.”

सागरिका सुमन या असा दावा करते की,”उमेश कामत यांना आताच एका ऍडल्ट व्हिडिओ बाबत अटक केले आहे. तो राज कुंद्रा याचा असिस्टंट आहे.” त्यानंतर ती असं म्हणते की, “मला फक्त एवढंच वाटतं की, या पॉर्न वेबसाईटला लवकरच बंद केलं पाहिजे. या सगळ्याचा परिणाम आपल्या भारतीय संस्कृतीवर होत आहे.”

सागरिका म्हणते की,” याबाबत माझा अनुभव खूप वाईट आहे. कारण माझ्यासोबत देखील हे एकदा झाले होते. परंतु मी त्याला आयुष्यातला एक वाईट अनुभव होता, असं म्हणून सोडून दिलं होतं. परंतु गेल्या 2- 3 दिवसापासून मी जे काही सोशल मीडियावर बघत आहे त्यावरून मला अस वाटतंय की, कोणीतरी या बाबत पुढाकार घेतला पाहिजे. आणि सगळ्या मुलींना सांगितले पाहिजे की त्यांनी या जाळ्यात अडकायला नाही पाहिजे.”

त्यानंतर सागरिका स्वतः सोबत घडलेला एक प्रसंग सांगताना अस म्हणते की, “मला एकदा व्हिडिओ कॉलवर ऑडिशनच्या नावाखाली न्यूड ऑडिशनची ऑफर मिळाली होती. ज्या ऑफरला मी तेव्हाच नकार दिला होता. त्यावेळी तिकडे उमेश कामत होते. एकूण तीन माणसं होती. त्यातील एकाचा चेहरा नीट दिसत नव्हता. मला अस वाटतंय की, राज कुंद्रा होते. कारण उमेश कामात सारखं सारखं राज कुंद्रा यांचं नाव घेत होते. आता जेवढ्या काही पॉर्न वेबसाईट आहेत. त्याचे मालक राज कुंद्रा हेच आहेत.”

त्यानंतर सागरिका म्हणते की, “पण मला एक गोष्ट कळत नाहीये की, राज कुंद्रा यांना अटक का नाही केली जात. मीडियावर देखील सगळ्यांना या बाबत माहित पडले आहे. मला अस वाटतं की, या सगळ्याचे कर्तेधर्ते तेच आहेत.”

या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असलेल्या कंपनीच्या पीआरओ ‘रीना थापर’ यांना देखील याबाबत विचारण्यात आले. पण त्यांनी यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. ‘रीना थापर’ फक्त एवढच सांगते की, “सागरिका सोना यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. असं कोणावरही आरोप केल्यावर लगेच ती बातमी बनत नाही.” याबाबतीत आधीच एक अटक झाली आहे आणि सागरिका हिने उमेश कामत आणि राज कुंद्रा यांचं नाव मध्ये घेतलं आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात
-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.